शिवसेनेचा भाजपवर घणाघात ; एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!

सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल
Sanjay Raut.jpg
Sanjay Raut.jpg

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. बेळगावच्या या विजयाचा आनंद भाजपने पेठे वाटून साजरा केला. 'मराठी माणसाचा पराभव झाल्याचे दुःख टोचणारे असताना भाजपने आनंद साजरा केला,' अशा शब्दात  शिवसेनेने Shiv Sena भाजपवर ताशेरे ओढले आहेत.  'सामना'तून भाजपचा समाचार घेण्यात आला आहे. 

मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे. बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे, असं सांगताना एक निवडणूक हरलो म्हणून लढा संपत नाही. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे. 
 
असं आहे तालिबानचं नवं मंत्रिमंडळ ; महिलांकडे एकही खातं नाही. 
अखंड महाराष्ट्राबाबत यांना आस्था नव्हती आणि नाहीच. बेळगावात शिवसेना कधीच लढली नाही. सीमा आंदोलनात सहभागी असलेले शरद पवारही कधी बेळगाव निवडणुकीच्या आखाड्यात उतरले नाहीत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारीही कधी सीमा बांधवांशी बेईमानी करताना आढळले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या परीने सीमाभागातील मराठी बांधवांना बळ देण्याचेच प्रयत्न केले, पण बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय? असा सवाल शिवसेनेनं 'सामना'तून उपस्थित केला आहे. 

  • बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला.
  • क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे.
  • एकीकरण समितीने वॉर्ड रचनेवर आक्षेप घेतला, म्हणजे मराठी लोकवस्तीचे बालेकिल्ले असे काही फोडले की मराठी एकजुटीचा विजय होऊच नये.
  • अनेक बुथवर ईव्हीएममधून कागदी स्लिपच बाहेर येत नव्हती. हे सर्व समोर आणूनही कर्नाटक प्रशासनाने निवडणूक जोरजबरदस्तीने रेटून नेली.
  • भाजपास पूर्ण बहुमत मिळाले व महाराष्ट्र एकीकरण समितीस पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा आनंद महाराष्ट्राला होऊच शकत नाही. 
  • बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय?
  • आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com