धक्कादायक : माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच केले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 

सासरच्या दारातचतिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले
Sarkarnama - 2021-09-18T114451.591.jpg
Sarkarnama - 2021-09-18T114451.591.jpg

सातारा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन गुजरात येथे आत्महत्या केली. विवाहितेच्या आत्महत्येनंतर खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावात माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत 

साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे (Koparde) हे सासर असणाऱ्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन काल आत्महत्या केली. यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर संताप व्यक्त केल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मयुरी चंद्रशेखर शिंदे (Mayuri Shinde) असे त्या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. चार वर्षापूर्वी मयुरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा असून कोपर्डे येथील हे दाम्पत्य आपल्या मुलासमवेत गुजरातच्या नवसारी येथे नोकरी निमित्ताने राहत होते. 

आत्महत्या केलेल्या विवाहितेचा अंत्यविधी माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच केल्याने तणाव निर्माण झाला. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मध्यस्थी करत हे प्रकरण हाताळले. त्यामुळे तणावावर नियंत्रण मिळवता आले. 

CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे?
याप्रकरणी सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरे  उत्तमराव शिंदे  सासू बेबी शिंदे , पती चंद्रशेखर शिंदे , दिर प्रशांत शिंदे, नणंद संगीता भोसले,स्वाती काकडे, मंगल कदम यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरर्डे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com