CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे? 

समन्स बजावूनही अनुपस्थित राहणा-या परमबीर सिंहयांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला होता.
Parambir Singh.jpg
Parambir Singh.jpg

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे FIR नोंदवण्यात आले आहेत. यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे.  चांदिवाल समितीने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  विरोधात जारी केलेल्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी चंदीगढला गेलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या(cid) पथकाला सिंग तेथील घरी सापडले नाहीत. 

परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांकडून लुक आऊट नोटिस बजावण्यात आली आहे. त्याबाबत पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडे तपासणी केली होती. त्यात परमबीर सिंग यांच्या परदेशी प्रवासाची कोणतीही नोंद सापडलेली नाही. अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने वारंवार समन्स बजावूनही अनुपस्थित राहणा-या परमबीर  सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला होता. चांदिवाल समितीने हे वॉरंट जारी करून त्याची अंमलबजावणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत करण्याचे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले होते.

महापालिकेत शिवसेना-भाजपात जुंपली ; ठेकेदारांवरुन खडाजंगी
राज्याच्या पोलिस महासंचालकांनी या वॉरंट अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सीआयडीच्या पथकावर सोपवली. त्यानुसार सीआयडीचे एक पथक सिंग यांच्या संभाव्य सर्व ठिकाणांवर गेली होती. त्यात मुंबईतील मलबारहिलसह चंदीगढ येथील घरीही सीआयडीचे पथक गेले होते. मात्र, दोन्ही ठिकाण परमबिर सिंह हे आढळले नाहीत.  या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 22 सप्टेंबर रोजीआहे. त्यावेळी सीआयडीच्या अधिका-यांना वॉरंटच्या अंमलबजावणीबाबत माहिती द्यावी लागेल.

मोठी कारवाई ; ATSने एकाला ताब्यात घेतलं,  जान मोहम्मदचा हँडलर असण्याची शक्यता
सीआयडीचे पथक आणखी काही काळ तेथेच थांबणार असून त्यानंतर ते परत येईल, असेही सूत्रांनी सांगितले. यापूर्वी पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही आणि तीन वेळा दंड ठोठावूनही हजेरी न लावल्याने समितीने परमबीर सिंग यांना शेवटची संधी देत 7 सप्टेंबरच्या सुनावणीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते. त्यादिवशी हजेरी न लावल्यास वॉरंट काढण्याचा इशाराही दिला होता. पण त्यानंतरही परमबीर सिंग चांदिवाल समितीच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अखेर समितीने याप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात वॉरंट जारी केला होता.

परमबिर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे FIR नोंदवण्यात आले आहेत.यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे. सरकारकडून Maharashtra Government परमबीर यांच्याशी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी त्यांच्यावर शस्त्र क्रिया केली जाणार असल्याचे सांगत मेडिकल कागदपत्रे पाठवली. सरकारने यापूर्वी सिंग यांच्या चंडिगढ येथील घराच्या पत्त्यावर दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोणतही उत्तर आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Edited by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com