पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवशी बूथप्रमुखांना देणार कानमंत्र!   

पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या घटना, घडामोडींविषयी ते बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.
Prime Minister Narendra Modi will interact with the booth chief
Prime Minister Narendra Modi will interact with the booth chief

सोलापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी भारतीय जनता पक्षाने गांभीर्याने सुरू केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने बूथ सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने ‘समर्थ बूथ अभियाना’चा नारा दिला आहे. राज्यातील सुमारे ८० हजार बूथप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी संवाद साधणार आहेत. पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या घटना, घडामोडींविषयी ते बूथप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will interact with the booth chief)

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा या राज्यांसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात रंगणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आता समर्थ बुथ अभियानाचा नारा दिला जात आहे. या माध्यमातून गाव पातळीवरील बूथ यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने समर्थ बूथ अभियानाचा नारा दिला आहे. त्या अंतर्गत राज्यातील नेतेमंडळी विविध जिल्ह्यांत जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने बूथ प्रमुख हा महत्त्वाचा दुवा आहे. त्या बूथ प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 17 सप्टेंबर रोजी संवाद साधणार आहेत. पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या घटना, घडामोडींविषयी ते बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील जवळपास 80 हजार बूथ प्रमुखांना पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी सगळी बूथ यंत्रणा सक्षम करून ती पूर्ण केली जाणार आहे.

डिसेंबर-जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत स्वबळावर लढून सत्ता काबीज करण्याची व्यूहरचना पक्षाच्या वतीने आतापासूनच सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी समर्थ बूथ यंत्रणेचा नारा भाजपने दिला आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने कामालाही सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पंतप्रधान मोदी हे १७ सप्टेंबर रोजी बूथप्रमुखांना पक्षवाढीसंदर्भात कानमंत्र देणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com