आमदार प्रीतम पंवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसनंही टाकले होते फासे

भाजपच्या मुख्यालयात केंदीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पंवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
MLA Pritam Singh Panwar joins BJP amid assembly election
MLA Pritam Singh Panwar joins BJP amid assembly election

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली असून इतर पक्षांतील आमदारांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी उत्तराखंडमधील (Uttarakhand) अपक्ष आमदार प्रीतम सिंह पंवार (Pritam Singh Panwar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंवार यांच्यावर काँग्रेसचीही नजर होती. (MLA Pritam Singh Panwar joins BJP amid assembly election)

प्रीतम पंवार यांनी उत्तराखंड क्रांती दलातील आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांच्यासाठी बुधवार टर्निंग पॉईंट ठरला आहे. ते धनोल्टी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपच्या मुख्यालयात केंदीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पंवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष मदन कौशिक आणि खासदार अनिल बलूनी उपस्थित होते. 

निवडणुकीच्या तोंडावर पंवार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनंही प्रयत्न केले होते. पण त्याआधीच ते भाजपच्या गळाला लागले. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीही बदलण्यात आले होते. काँग्रेसमधील काही आमदारांनाही पक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. 

राज्यपालांचा राजीनामा

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्या यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे. मौर्या या उत्तर प्रदेशातील असून पुढील वर्षी या राज्यातही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते, म्हणून त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान, वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. 

काँग्रेसकडून सर्व आमदारांना खूशखबर

काँग्रेसनं आगामी निवडणुकीसाठी सध्याच्या सर्व आमदारांना पुन्हा तिकीट देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून 38 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोडीयाल यांनी दिली. बंडखोरी केलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेतले जाईल. पण त्यासाठी काही निकष ठरवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागा आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com