Russian Minister dies after jumping to save cameraman
Russian Minister dies after jumping to save cameraman

मंत्र्यांनी कॅमेरामनला वाचवायला पाण्यात उडी घेतली अन् स्वत:चाच जीव गमावला!

त्यांनी याआधीही अनेक महत्वाची पदं सांभाळली होती.

मॉस्को : रशियाच्या आपत्कालीन विभागाचे मंत्री येवगेनी जिनिचेव (Yevgeny Zinichev) यांचा बुधवारी एका अपघातात मृत्यू झाला. उंच कड्यावरून पाण्यात पडलेल्या कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात येवगेनी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. उडी मारल्यानंतर येवगेनी यांचं डोकं खडकावर आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. (Russian Minister dies after jumping to save cameraman) 

रशियातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, येवगेनी जिनिचेव हे एका प्रशिक्षण अभ्यासामध्ये सहभागी झाले होते. तिथे चित्रीकरण सुरू असताना एका कड्यावरून कॅमेरामन पडत असल्याचं येवगेनी पाहिलं. इतरांना काही कळण्याच्या आताच येवगेनी यांनी पाण्यात उडी घेतली. पण त्यांचं डोकं दगडावर आदळलं अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असं वृत्त आहे. त्यांचा मृत्यू नेमका कुठे व कधी झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

मंत्रालयाकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. रशियातील एका वृत्तसंस्थेच्या संपादक मार्गारिटा सिमोनयान यांनी सांगितले की, मंत्र्यांचा मृत्यू एका कड्यावरून पडणाऱ्या कॅमेरामनला वाचवताना झाला आहे. दोघेजण एका डोंगरकड्याच्या कडेला उभे होते. यावेळी हा कॅमेरामन अचानक खाली पडला. त्याचवेळी मंत्र्यांनीही पाण्यात उडी मारली. पाण्यात जाताच ते एका खडकावर आपटले, असं सिमोनयान यांनी सांगितलं आहे. ते 55 वर्षांचे होते.

जिनिचेव हे आधी सोवियत संघाच्या शेवटच्या काळात केजीबी सिक्युरिटी सर्व्हीसचे सदस्य होते. त्यानंतर अनेक चढउतार पार करत ते 2018 मध्ये रशियाचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख बनले. सैबेरियामध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्यानंतर त्यांच्या आधीच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. या आगीमध्ये 60 नागरिकांचा मृत्यू झाला होता. जिनिचेव यांनी याआधीही अनेक महत्वाची पदं सांभाळली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com