देश सोडून पळालेले अध्यक्ष अखेर अवतरले अन् सांगितलं खरं कारण...

अशरफ घनी यांनी अखेर बुधवारी पहिल्यांदाच सविस्तर निवेदन प्रसिध्द केलं आहे.
Afghanistans Ex President Ashraf Ghani Apologises
Afghanistans Ex President Ashraf Ghani Apologises

काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले. त्यांनी जाताना कोट्यवधी रुपये नेल्याचंही बोललं जातं. पळून गेल्यानंतर त्यांना दुबईत आसरा देण्यात आला आहे. अफगाण तालिबान्यांच्या हाती गेल्यानंतर एकदाही घनी यांच्याकडून कसलंही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं ते अफगाण नागरिकांच्या टीकेचं लक्ष्य बनले आहेत. (Afghanistans Ex President Ashraf Ghani Apologises)

अशरफ घनी यांनी अखेर बुधवारी पहिल्यांदाच सविस्तर निवेदन प्रसिध्द केलं आहे. त्यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काबूल सोडून जाण्याचा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. देशातील लोकांना वाचविणे आणि बंदूकांना शांत करण्यासाठी माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. अफगाणींचे कोट्यवधी रुपये घेऊन पळाल्याचे आरोपही चुकीचे असल्याचं घनी यांनी निवेदनात म्हटलं आहे. 

घनी म्हणाले, 15 ऑगस्टला तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर मी देश सोडला. त्यावर लोकांना स्पष्टीकरण देणे माझं कर्तव्य आहे. काबूलमधील पॅलेसची सुरक्षा करणाऱ्या लोकांच्या सल्ल्यामुळं मला जावं लागलं. अन्यथा 1990 सारखी गृहयुध्दाची स्थिती निर्माण झाली असती. आताची वेळ मी देश सोडण्यावर चर्चा करण्याची नाही. यावर मी पुढे कधीतरी बोलेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पैसे घेऊन पळालो नाही

घनी यांनी पैसे घेऊन पळाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. मी आणि माझी पत्नी आपल्याकडील संपत्तीविषयी प्रामाणिक आहोत. माझ्या संपत्तीविषयीची माहिती मी सार्वजनिक केली आहे. माझ्या पत्नीला वारश्याने मिळालेल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे. मी माझ्या व सहकाऱ्यांच्या संपत्तीचे ऑडिट करायलाही तयार आहे, असंही घनी यांनी सांगितलं.

घनी यांनी अपगाण नागरिकांची माफीही मागितली आहे. अफगाणी नागरिक, विशेषत: अफगाणी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचा मी सन्मान करतो. मागील 40 वर्षात त्यांनी देशासाठी मोठं बलिदान केलं आहे. आपल्या पुर्वजांप्रमाणेच अंत झाल्याचंही ते म्हणाले. पण याचा शेवट काही वेगळा करू इच्छित होतो, असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com