Sarkarnama Banner - 2021-08-12T083449.699.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-12T083449.699.jpg

मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली ; कॉग्रेसची जहरी टीका

आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे Praniti Shinde यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर जहरी टीका केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. 

महिलांचा अपमान करणाऱ्यांनो, 'लक्ष्मणरेषा' पाळा ; शिवसेना आक्रमक
प्रणिती शिंदे म्हणाल्या की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. एकदाही ते माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. 

''आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,'' अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर मतदान प्रक्रियेत बदल करण्याचे संकेतही शिंदे यांनी दिले आहेत.

संभाजीराजेंना बोलू देण्यासाठी संजय राऊतांनी चढवला आवाज
नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक चर्चेसाठी सादर करण्यात आले होते. अनेक सदस्यांनी यावरी चर्चेत सहभाग घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या विधेयकावर बोलण्याची संधी मागितली होती. मात्र, सुरूवातीला त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आवाज चढवत त्यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत संभाजीराजेंना बोलण्याची परवानगी देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com