महिलांचा अपमान करणाऱ्यांनो, 'लक्ष्मणरेषा' पाळा ; शिवसेना आक्रमक

किटकनाशक कंपनीने सर्व महिलांची माफी मागावी, अन्यथा आंदोलन केले जाईल,' असा इशारा शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दिला आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांनो, 'लक्ष्मणरेषा' पाळा ; शिवसेना आक्रमक
Sarkarnama Banner - 2021-08-11T164145.735.jpg

मुंबई : 'झुरळाला घाबरून एका घरातील महिला नवऱ्याच्या समोरच घरात काम करणाऱ्या सुताराच्या अंगावर उडी मारते व तो तिला अलगद पकडतो,' अशी जाहिरात करणाऱ्या एका किटकनाशक कंपनीने सर्व महिलांची माफी मागावी, अन्यथा आंदोलन केले जाईल,' असा इशारा शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दिला आहे. 

या जाहिरातीचे प्रक्षेपण न थांबविल्यास या कंपनी विरोधात आंदोलन केले जाईल, तसेच अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली जाईल, असेही कायंदे यांनी बजावले आहे. महिलांचा अवमान न करण्याची `लक्ष्मणरेषा` सर्वांनीच पाळावी, असेही त्यांनी सुनावले आहे.  

अजितदादांनी लिहिलं मोदींना पत्र..
झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीच्या या जाहिरातीत वरील प्रकारे समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे. आपल्या वस्तूची जाहिरात करण्याचा सर्वानाच अधिकार आहे. परंतु त्याद्वारे कोणत्याही मनुष्यजातीचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. अशी जाहिरात बनविणाऱ्यांच्या व हे उत्पादन बनवत असलेल्या कंपनीच्या हीन प्रवृत्तीचे द्योतक म्हणजे ही जाहिरात आहे, असेही कायंदे यांनी म्हटले आहे. 

या कंपनीने महिलांचा या जाहिरातीत अपमान केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशी थेरं आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. एखादा पुरुष घाबरला व त्याने सुताराला मिठी मारली असे जाहिरातीत दाखवून सुद्धा उत्पादनाची महानता दाखविली गेली असती. परंतु या जाहिरातीत महिला वर्गाला दुबळी दाखवून पुरुषाचा अहंकार जोपासण्याचा व त्याला रक्षणकर्ता दाखवण्याचा प्रकार झाला आहे.

आज एकविसाव्या शतकातही स्त्री पुरुष सामान नाहीत हे या जाहिरातीत अधोरेखेत केले आहे. मीरा कुमारी सारख्या भारतीय महिला ऑलीम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकत असताना महिलांना जाहिरातीत कमजोर दाखवून आपले उत्पादन विकण्याचा केविलवाणा प्रयत्न हे जाहिरातदार व कंपन्या करीत आहेत. अशा कंपन्यांनी व जाहिरात करणाऱ्यांनी आपली `लक्ष्मणरेषा` पाळावी अन्यथा शिवसेना महिला आघाडी त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही कायंदे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.