कानपूरच्या भाजप महापौरांची उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार

त्यांना ठोसा मारून मी उत्तर देईल.
Kanpur BJP mayor gave police complaint against Uddhav Thackeray
Kanpur BJP mayor gave police complaint against Uddhav Thackeray

कानपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कानपूरमध्ये पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. कानपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या महापौर प्रमिला पांडे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेनेत आणखी वाद पेटण्याची चिन्हे आहेत. (Kanpur BJP mayor gave police complaint against Uddhav Thackeray)
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी राणे यांना अटक करण्यात आली होती. त्याची चर्चा देशभर झाली होती. राणेंच्या अटकेपासून भाजपच्या सरकार असलेल्या राज्यांमध्ये शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राग व्यक्त करण्यात येत आहे. त्यातूनच कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात कानपूरच्या स्वरूप नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, जर उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशात आले, तर चप्पल कशी मारली जाते, हे मी त्यांना दाखवेन. त्यांनी उद्धव ठाकरेंवर सीएम योगींविषयी असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे आणि त्यावरून ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

तक्रारीत त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी त्यांना ताकीद देते की जर ते उत्तर प्रदेशात आले तर मी चप्पल कशी मारली जाते ते सांगेन. मी त्यांना चप्पल मारणार नाही, माझ्या पक्षाचे संस्कार असे नाहीत. पण, त्यांना ठोसा मारून मी उत्तर देईल. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून ठाकरे यांच्या विरोधात कानपूरमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com