माझ्यामुळे तुमची अडचण होत असेल, तर मी जातो, असे म्हणत अब्दुल सत्तारांनी व्यासपीठ सोडले 

अब्दुल सत्तार यांचा अवमान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप बेनके यांनी केला.
Minister of State Abdul Sattar left without inaugurating the village secretariat
Minister of State Abdul Sattar left without inaugurating the village secretariat

आळेफाटा (जि. पुणे): महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन घटक पक्षांत विकासकामांच्या श्रेयवादावरून धुसफूस सुरु असल्याचे कायम निदर्शनास येते. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात नेहमीच कुरघोडी सुरू असते. याचा प्रत्यय राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही आला. (Minister of State Abdul Sattar left without inaugurating the village secretariat)

जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे शुक्रवारी (ता. २७ ) ग्रामपंचायतीच्या ‘ग्राम संसद'  या ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ व शिवसेनेच्या शाखा कार्यालयाचे उदघाटन राज्यमंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या वेळी राज्यमंत्री सत्तार यांनी शिवसेनेच्या शाखा कार्यालयाचे उदघाटन केले. तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके जुन्नर येथील प्रशासकीय बैठकीत उपस्थित होते. ते आल्यानंतर ग्रामसचिवालयाचे उदघाटन करू; तोपर्यत सभा सुरू करू, असे ठरविण्यात आले. 

सभेच्या सुरुवातीला माजी सभापती शिवाजी चव्हाण यांनी प्रास्तविक भाषणास सुरवात केली. त्यांच्या भाषणादरम्यान दोन तीन वेळा माईक बंद पडला. माईक बंद करा, असे कोणीतरी सांगितले असल्याने माईक बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. या वेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘माझ्यामुळे तुम्हाला अडचण होत असेल, तर मी जातो,’ असे म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार व्यासपीठावरुन उठले व कार्यक्रमातून निघून गेले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे ठिकाण सोडले. त्यानंतर आमदार बेनके यांच्या हस्ते ग्रामसचिवालयाचे उदघाटन करण्यात आले. 

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षात विकास कामांच्या श्रेयवादावरून सुरू असणारी धुसफूस या वेळी पुन्हा पहावयास मिळाली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, देवदत्त निकम, सरपंच लता चव्हाण आदी उपस्थित होते.            

दरम्यान, या कार्यक्रमासाठी सर्वजण जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची वाट पाहत होते. आमदार बेनके येताच उदघाटन होणार असल्याचे गृहीत धरून कार्यक्रम सुरु करण्यात आला. उशीरा आलेल्या आमदार बेनके यांनी विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. राज्यमंत्री सत्तार, माजी खासदारांची, त्यांच्या नेतेमंडळींची चूक नाही. त्यांचा अवमान गावाने केलेला नाही, तर त्यांचा अवमान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप बेनके यांनी केला. 

माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, पारगावतर्फे आळे या गावात जो काय प्रकार घडला, तो चांगला नाही. मंत्र्यांच्या कार्यक्रमात माईक बंद करणे, हा त्यांचा अपमान नसून हा अपमान जुन्नर तालुक्यातील जनतेचा आहे. सभा सुरू झाल्यानंतर पहिल्या भाषणाच्या वेळी दोन ते तीन वेळा माईक बंद करण्यात आला. यामुळे व्यासपीठावरील काही मान्यवरांनी स्पीकर ऑपरेटला विचारले, ‘माईक का बंद करता, तेव्हा त्याने सांगितले की, मला फोन आला होता माईक बंद कर म्हणून त्यानंतर मी माईक बंद केला. त्यामुळे मंत्री सत्तार हे ‘माझ्यामुळे अडचण होत असेल, तर मी निघून जातो,असे म्हणून ते निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com