आम्हाला हात लावाल तर जळून खाक व्हाल : भास्कर जाधवांचा पुन्हा इशारा

शिवसैनिक अंगार असल्याचा इशारा
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav

खेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आपले दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार हेच आपले संस्कार आहेत. आमच्या पक्षप्रमुखांची बदनामी शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. कोणी अंगावर येणार असेल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याची प्रचिती नारायण राणे (Narayan Rane) व भाजपवाल्यांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी करून दिली आहे. यापुढे अशी चूक पुन्हा कुणीही करणार नाही. शिवसैनिक हा धगधगता निखारा आहे. त्याला हात लावला तर जळून खाक व्हाल. आमचा नाद करायचा नाही, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी धामणदेवी जि. प. गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

विकासकामांसाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. भूमिपुत्रांवरील अन्याय भास्कर जाधव खपवून घेणार नाही. माझे बांधव प्रदूषणाचा सामना करतात. या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या रोजगारांवर त्यांचा प्रथम हक्क आहे. कुणी कायद्याची, पोलिसांची भीती दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार असेल तर गाठ शिवसेनेशी आहे. गमिनी काव्याने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसैनिकांना संघटनात्मक कामावर भर द्या. गावागावात शिवसेना मजूबत उभी करा. धामणदेवी गटावरचा शिवसेनेचा भगवा सतत तेजाने फडकवत ठेवा, असे आवाहन जाधव यांनी केले. शशिकांत चव्हाण यांनी आक्रमक भाषण करून शिवसैनिकांमध्ये जोश भरला. माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती मानसी जगदाळे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 

भाजपाच्या यात्रा आयोजकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी :  जमावबंदी आणि कोरोना काळात शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरात नुकत्याच झालेल्या जन आशीर्वाद यात्रेतील भाजपच्या संयोजक, आयोजकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरवात झाल्यानंतर रत्नागिरी दौऱ्यात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात मारुती मंदिर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले होते. जमावबंदी व कोरोना संसर्ग असतानाही या कार्यक्रमात गर्दी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी गर्दींचा फायदा घेऊन चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना घडली होती. या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आदेश देण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यामुळे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, संकेत बावकर, प्रफुल्ल पिसे अशा चार जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com