सांगली महापालिका आयुक्तांनी पिंपरीच्या आयुक्तांचे केलं तोंडभरून कौतुक

सांगली-मिरज-कूपवाडा महापालिका आयुक्तांनी पिंपरी महापालिका आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-04T140100.575.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-04T140100.575.jpg

पिंपरीःमहापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेल्या सांगली Sangli शहरातील जीवन पूर्वपदावर आणण्यात पिंपरी पालिकेचा मोठा वाटा राहिला आहे. पिंपरी पालिकेच्या Pimpri Municipal Corporation पथकाने सहा दिवस अहोरात्र केलेल्या साफसफाईच्या कामामुळे सांगलीच नव्हे,तर परिसरातील रोगराई पसरण्याचा धोका टळण्यास मोठी मदत झाली आहे. त्याबद्दल सांगली-मिरज-कूपवाडा महापालिका आयुक्तांनी पिंपरी महापालिका आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यानंतर पिंपरीच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनीही त्यांना  शाबासकी दिली.  

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात नुकत्याच उदभवलेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीत राज्यभरातून मदतीचा महापूर मानवतेच्या भुमिकेतून राजकीय मतभेद विसरून पूरग्रस्त भागात आला. त्यातूनच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता असलेल्या सांगली पालिकेत भाजप सत्ताधारी पिंपरी पालिकेनेही आपला वाटा उचलला. तशीच मदत शिवसेना सत्तेत असलेल्या मुंबई महापालिकेचीही झाली. या दोन्ही श्रीमंत आणि आधुनिक यंत्रसामग्री असलेल्या पालिकेची मदत पथके गेले काही दिवस सांगलीत तळ ठोकून होती. पूरानंतर तातडीने करावे लागणारे स्वच्छतेचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यानंतर तेथे रोगराई लगेचच पसरली नाही.

MPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार 
पिंपरी पालिकेचे एकूण १२० जणांचे मदत पथक सांगली,मिरज परिसरात कार्यरत होते. त्याचे नेतृत्व सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर करीत होते. त्यात सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप फड, डॉ. उल्पेश महाजन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, स्वयंसेवक कुणाल साठे, कुणाल सातव, प्रवीण कुदळे, दहाजणांचे वैद्यकीय पथक, अग्निशमन पथक, आठ आधुनिक सफाई यंत्रणा पथक,आठ सर्पमित्र, तीस स्वयंसेवक आणि १८ वाहनांचा समावेश होता. 

अजित पवारांचा विरोध असतानाही एकनाथ शिंदेंनी मोहिते पाटलांना केलं खुश 
२७ जुलैच्या रात्री सांगलीत गेलेल्या या टीमने लगेच कामाला सुरवात केली. ते सांगली पालिका हद्दीतील रिलीफ कामासाठी खरं, तर गेले होते. पण गरज ओळखून सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ग्रामीण भागातही पाठवले. एवढेच नाही, तर दत्त दिगंबराचे मोठं ठाणं असलेल्या नरसोबाचीवाडी या शिरोळ तालुक्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्येही जाऊन त्यांनी साफसफाई केली. साठ, चाळीस या प्रमाणात शहरी व ग्रामीण भागात गरजेनुसार काम केले, असे पथकप्रमुख खांडेकर यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. 

या मोहिमेत मदतकार्य व वाटपात अडथळा ठरणारा गाळ, कचरा, चिखल काढण्याला प्रथम प्राधान्य दिले, असे या पथकातील पिंपरी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बहिवाल म्हणाले. या कारवाईत अनेक साप मिळून आले. ते पथकातील सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सांगली दौऱ्यात पाहणी केलेल्या दोन्ही डिग्रज गावांची सफाई पिंपरीच्याच पथकाने केली. या गावातील मंदिर व व शाळाही पाण्याखाली गेल्या होत्या.

पिंपरी पालिकेच्या पथकाच्या मदतकार्याबद्दल त्यांचे व पिंपरी पालिकेचेही सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना २ ऑगस्ट रोजी पत्र लिहून सांगलीकरांतर्फे आभार मानले आहेत. या पथकामुळे अवघ्या सहा दिवसांत सांगली पूर्वपदावर आल्याची प्रांजळ कबुली देत त्यांनी या रिलीफ कामाचं कौतूक केलं आहे. पिंपरी पालिकेच्या कुशल कामगारांनी अतिशय वेगाने स्वच्छतेचे काम केल्याबद्दल त्यांना मोठ्ठ अप्रूप वाटलं आहे.  या पथकाने केलेल्या औषध फवारणीमुळे सांगलीत रोगराई पसरण्याचा धोका टळल्याचेही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान, आठवडाभर शाळेत राहून मदतकार्य केलेल्या व परवा परतलेल्या आपल्या या पथकाचे पिंपरी आयुक्त व महापौरांनीही कौतुक केले आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com