MPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार

यापूर्वी 11 एप्रिलला ही परीक्षाहोणार होती पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
2Sarkarnama_20Banner_20_2826_29_3.jpg
2Sarkarnama_20Banner_20_2826_29_3.jpg

पुणे  : राज्यात कोरोना संकटामुळे स्पर्धा परीक्षां पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही परीक्षा यापूर्वी 11 एप्रिलला होणार होती पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता कोरोना निर्बंधांमधून शिथिलता देखील देण्यात आल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. 

आता राज्य सरकारने यामधील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Subordinate Services Non-Gazetted Group-B) ही 4 सप्टेंबर 2021 ला होणार असल्याचं जाहीर केले आहे. त्याबाबतचं परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या आपवत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या परवानगीनुसार शनिवारी ४ सप्टेंबर २०२१ रोजी अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पुर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच याबाबतची अधिक माहिती संकेत स्थळावर देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

MPSC : अजितदादांनी शब्द पाळला!
मुंबई : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच रखडलेल्या परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि त्याच्या पालकाना सतावत आहे. काही दिवसापूर्वी  पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ता. ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com