अजित पवारांचा विरोध असतानाही एकनाथ शिंदेंनी मोहिते पाटलांना केलं खुश 

अजित पवार यांचा विरोध असतानाही हा निर्णय का घेतला अशीही चर्चा आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-04T100559.846.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-04T100559.846.jpg

पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना काल राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली. तीन आठवड्यांत अध्यादेश काढावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे मोहिते पाटील Mohite Patil यांच्या लढाईला अखेर यश मिळाले असून अकलूज माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांचा विजय झाल्याची चर्चा आहे. तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा विरोध असतानाही हा निर्णय का घेतला अशीही चर्चा आहे. 

अकलूज- माळेवाडी व  नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीचा विचार करून तसे आदेश दिले होते. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतींचे प्रस्ताव लाल फितीत अडकले होते. या निर्णयाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध होता, असा आरोप ही  मोहिते-पाटील यांनी केला होता. 

व्वा! मोदीजी व्वा! तुमच्या राज्यात खासदारपण गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत!
राज्य सरकारने अकलूज ग्रामस्थांची ही  मागणी मान्य करत अकलूज- माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर परिषद व नगरपंचायती मध्ये रूपांतर करण्याचा अध्यादेश काल काढला.अकलूजकरांच्या या मागणीला  राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असतानाही शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र अकलूजकरांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत राष्ट्रवादीवर मात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कवी महानोरांचा गणपतरावांच्या आठवणींना उजाळा : भ्रष्टाचाराची सावलीही न पडलेला नेता
अकलूजचे मोहिते - पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय वैर जग जाहीर आहे.‌ यामध्ये मोहिते पाटील विरोधी पक्षात असतानाही अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यात ते  यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेने देखील अजित पवारांचा विरोध डावलून मोहीते पाटलांची मागणी पूर्ण केली आहे. यामध्ये पवार हरले अन्  मोहीते जिंकले अशी चर्चा सुरू झाली आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com