जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ बंद ; अण्णा द्रुमुक आक्रमक

मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत जयललिता यांनी 60 हून अधिक महाविद्यालये स्थापन करण्यात आली होती.
Sarkarnama (45).jpg
Sarkarnama (45).jpg

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या डीएमके DMK सरकारने दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. या प्रकारानंतर अण्णा द्रमुकने सभात्याग केला. उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांनी जयललिता विद्यापीठाचा समावेश अन्नामलाई विद्यापीठात Annamalai University करण्याचे विधेयक मांडले होते.  हे विद्यापीठ अन्नामलाई विद्यापीठात समाविष्ठ करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. 

जयललिता यांनी  प्राथमिक आणि उच्च शिक्षणासह शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले होते.  त्यांनी मोफत लॅपटॉप सारख्या अनेक योजना आणल्या आहेत. अशा उपक्रमांमुळे तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांची एकूण नावनोंदणी प्रमाण दुप्पट झाले. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत जयललिता यांनी कला, विज्ञान आणि कायद्याच्या विषयांसह 60 हून अधिक महाविद्यालये स्थापन करण्यात आली होती.


'तुमचा आसाराम बापू करू' मनोहर मामांना धमकी  
''द्रमुक सरकारने राजकीय सूडबुध्दीतून ‘अम्मा’ जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहें. त्यांच्या पक्षाने विधानसभेत प्रास्ताविक टप्प्यातच या निर्णयाला विरोध केला. ते म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री प्राथमिक आणि उच्च शिक्षणासह शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले होते.'' असे अण्णा द्रुमुकचे पनीरसेल्वम म्हणाले. ओ पनीरसेल्वम आणि के पी अनबलगन यांनी याला विरोध केला आहे. 

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
मुंबई : एसटी ST आगारातील अपुऱ्या सुविधा अन् सुरक्षा याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते मुकेश भट यांनी ॲड. ए. पी. लोहाडे A. P. Lohade यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. एसटी आगार आणि एसटी थांब्यावर असलेल्या अपुऱ्या सोयी-सुविधांबाबत याचिकेत ऊहापोह करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com