'तुमचा आसाराम बापू करू' मनोहर मामांना धमकी  

बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी स्पष्ट केले.
manohar mama.jpg
manohar mama.jpg

पुणे : आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील बाळूमामाचे Balu Mama भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा Manohar Bhosale यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामाचा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे. येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापूर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी स्पष्ट केले.

मनोहर मामा याच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्यावर बारामती येथे फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश नानासाहेब आटोळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.  अंधश्रद्धेतून सात लाखाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.  बाळूमामा यांच्या जीवनावरील  मालिका सध्या टीव्हीवर जोरात सुरु असल्याने बाळूमामा यांच्याबाबत मोठी उत्सुकता सर्वसामान्य भक्तांमध्ये निर्माण होत आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले यांच्याविरुद्ध भक्तांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. भोसले यांनी  या आरोपांचे खंडण केले.  

काही जण माझ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागत आहेत. पैसे दिले नाही तर, तुमचा आसाराम बापू करू. त्याचे चित्र तुम्हाला दोन ते तीन दिवसांत दिसले, अशी धमकी मला दिली जात आहे. माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती  मनोहर चंद्रकांत भोसले यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com