जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिटेज निवासस्थानी बांधला स्वीमिंग पूल अन् जिम - District Magistrate built a swimming pool at the government residence | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिटेज निवासस्थानी बांधला स्वीमिंग पूल अन् जिम

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

आमदार व माजी नगरसेवकाने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

म्हैसूर : एका महिला अधिकाऱ्याने छळाचा आरोप केलेल्या म्हैसूरच्या जिल्हाधिकारी रोहिणी सिंदूरी यांची काही दिवसांपासून एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांनी शासकीय निवासस्थानात बेकायदेशीरपणे स्वीमिंग पुल आणि जिमची बांधल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (District Magistrate built a swimming pool at the government residence)

म्हैसूर (Mysore) महापालिकेच्या माजी आयुक्त शिल्पा नाग (Shilpa Nag) यांनी जिल्हाधिकारी रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) यांच्यावर नुकतेच पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले होते. सिंदुरी या छळ करत असल्याचा आरोप करत नाग यांनी चार दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचे जाहीरही केले होते. दोघींमधील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोघींचीही तडकाफडकी बदली करण्यात आली. 

हेही वाचा : दिल्लीत भाजपच्या सात मुख्यमंत्र्यांना बंगले; भाडं फक्त 2200 ते 2580 रुपये

पण हे प्रकरण समोर येण्याआधीच सिंदूरी यांची राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे. ता. 31 मे रोजीच चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंदूरी यांनी बेकायदेशीरपणे शासकीय निवासस्थानामध्ये जलतरण तलाव व जिम बांधल्याची तक्रार जनता दलाचे आमदार एस. आर. महेश आणि माजी नगरसेवक के. व्ही. मल्लेश यांनी केली आहे. या बांधकामासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. 

या तक्रारीनंतर म्हैसुरचे विभागीय आयुक्त जी. सी. प्रकाश यांनी चौकशीचे आदेश दिले. शासकीय निवासस्थानाचा समावेश हेरिजेट इमारतींमध्ये यापूर्वीच कऱण्यात आला आहे. तिथे कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे असे बांधकाम करणे या इमारतींसाठी धोकादायक असल्याचे तक्रारीवरून आदेश म्हटले आहे. सात दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रकार यांनी दिले आहेत. 

हेही वाचा : धक्कादायक : हॅास्पीटल मालकाने 96 रुग्णांचा ऑक्सिजनच बंद केला...व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सिंदूरी यांनी आपण कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नसल्याचे म्हटले आहे. निर्मिती केंद्र सोसायटी उपक्रमांतर्गत स्वीमिंग पुल उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे बांधकाम नियमांच्या अधिन राहूनच करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्यांमधील वादानंतर राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी तडकाफडकी दोघींची बदली करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सिंदुरी यांची बदली बेंगलुरू येथे हिंदु रिलिजियस अॅन्ड चॅरिटेबल संस्थेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नाग यांना ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे (ई-गव्हर्नन्स) संचालक करण्यात आले आहे. बदली रद्द करण्यासाठी सिंदुरी यांनी रविवारी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांची भेटही घेतली.  

दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये काय आहे वाद?

राजीनाम्या दिल्याची घोषणा नाग यांनी आज पत्रकार परिषदेत केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आज मी राजीनामा देत आहे. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे योग्य वातावरण नाही. कुणीही माझ्यासारखे अशा परिस्थितीतून जाऊ नये. जिल्हा उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी माझा अपमान केला आहे. मी माझा राजीनामा मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सिंदुरी या लक्ष्य करीत आहेत. महापालिकेने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. परंतु, याचे श्रेय जिल्हा प्रशासन घेत आहे. 

रोहिणी सिंदुरी यांनी त्यांच्या बचावासाठी मांडलेले पाच मुद्दे मांडले होते. मी शिल्पा नाग यांचा कोणताही छळ केलेला नाही आणि त्यांनी अशा एकाही घटनेचा उल्लेखही केलेला नाही. कोरोना संकटाच्या काळात माझ्यावर कोरोना महामारीच्या हाताळणीची जबाबदारी आहे. कोरोनाचे नियंत्रण करण्यावर माझा पूर्णपणे भर असून, माझ्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याला माझे प्राधान्य आहे. शिल्पा नाग या मागील काही काळापासून कोरोना आढावा बैठकांना उपस्थित राहत नाहीत. म्हैसूर शहर महापालिका कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्या याबद्दल विरोधाभासी माहिती देत आहेत. यात सुधारणा करण्याचे आदेश मी दिले होते. कल्पनाविलास केला तरी यातील एकही बाब छळ होत नाही. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख