दिल्लीत भाजपच्या सात मुख्यमंत्र्यांना बंगले; भाडं फक्त 2200 ते 2580 रुपये

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने माहिती अधिकारांतर्गत ही माहिती दिली आहे.
Nine Chief ministers has a separate house allocated in New Delhi
Nine Chief ministers has a separate house allocated in New Delhi

नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये देशातील नऊ मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून स्वतंत्र बंगले दिल्याचे समोर आलं आहे. या नऊमध्ये सात मुख्यमंत्री भाजप व मित्रपक्षांच्या आहेत. या बंगल्यांना भाडंही केवळ 2200 ते 4610 रुपये एवढंच आहे. हे बंगले मुख्यमंत्र्यांना का दिले,  याचे उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं नाही.

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने माहिती अधिकारांतर्गत ही माहिती दिली आहे. किती मुख्यमंत्र्यांना बंगले दिले आहेत, त्याचे भाडे, ते कोण देते, हे बंगले कधी आणि का दिले, किती मुख्यमंत्र्यांनी मागणी करूनही त्यांना बंगले मिळाले नाहीत, अशी माहिती मागवण्यात आली होती. पण केंद्र सरकारकडून बंगले देण्यामागचे कारण सांगण्यात आले नाही. 

बंगले भाड्याने दिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव व आंध्र प्रदेशचे वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे दोघेच बिगर भाजपचे आहेत. या दोघांना प्रति महिना 4 हजार 610 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. तर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, उत्तरांखडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, त्रिपुराचे बिप्लव कुमार देव, नागालँडचे नेफियू रिओ, मिझोरामचे  आणि मेघालचे मुख्यमंत्री सी. के. संगमा यांचा समावेश आहे. हे सातही जण भाजप व मित्रपक्षांचे मुख्यमंत्री आहेत. 

भाजप व मित्रपक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांना निश्चित करण्यात आलेले भाडे इतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत दुपटीने कमी आहे. हे भाडे प्रति महिना 2200 ते 2580 रुपयांच्या दरम्यान आहे. दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही या यादीत अजूनही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

नवी दिल्लीतील ल्युटेन्स बंगलो झोनमध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री, खासदार, अधिकारी, न्यायाधीशी आणि लष्करी अधिकाऱ्यांना बंगले दिले जातात. बहुतेकांची कार्यालये या परिसरात  आहेत. त्यांच्याकडून याचे भाडेही घेतले जाते. या बंगल्यांना नेहमीच खूप मागणी असते. त्यामुळे सरकारला बंगले देणे अनेकदा शक्य होत नाही. तरीही कधीतरी दिल्लीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे बंगले देण्यात आले आहेत. बहुतेक राज्यांचे दिल्लीत स्वतंत्र कार्यालय व गेस्ट हाऊस आहे. दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी याचा वापर करणे अपेक्षित आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com