आगामी विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह तेरा केंद्रीय मंत्र्यांची फौज 

फडणवीस यांच्या मदतीसाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्रीजी. किसन रेड्डी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis will be in charge of Goa for assembly election
Devendra Fadnavis will be in charge of Goa for assembly election

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्येक राज्यासाठी प्रभारी व सह प्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला दोन केंद्रीय मंत्रीही देण्यात आले आहेत. (Devendra Fadnavis will be in charge of Goa for assembly election)

देशात पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, मणिपूर व उत्तराखंड या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळं या राज्यांत सत्ता टिकवण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे. पंजाबमध्ये भाजपला सत्ता मिळण्याची फारशी शक्यता नाही. तर उत्तर प्रदेश हे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपसाठी महत्वाचं राज्य आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना गोव्याचे प्रभारी करण्यात आलं आहे. तर सहप्रभारी म्हणून केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री जी. किसन रेड्डी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आम्ही स्थापन करू, असा विश्वास फडणवीस यांनी या नियुक्तीनंतर व्यक्त केला. गोव्यात गेली चार निवडणुकांमध्ये जात आहे. त्यामुळे गोव्याचा चांगला परिचय आहे. महाराष्ट्रातील भाजप नेहमीच गोव्याच्या निवडणुकीत सक्रीय राहिली आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

उत्तर प्रदेशात पाच केंदीय मंत्री

उत्तर प्रदेशसाठी भाजपनं पाच केंद्रीय मंत्र्यांना नियुक्त केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे राज्याचे प्रभारी असतील. तर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी हे सहप्रभारी असतील. 

मणिपूरचे प्रभारी म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव तर सहप्रभारी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबच्या प्रभारीपदाची जबाबदारी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर सोपवण्यात आली असून केंद्रीय पेट्रोलिय मंत्री हरदीप सिंह पुरी व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री मीनाक्षी लेखी हे सहप्रभारी असतील. उत्तराखंड राज्याचे प्रभारी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी असतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com