0WhatsApp_20Image_202020_12_09_20at_2011.06.09_20AM.jpeg
0WhatsApp_20Image_202020_12_09_20at_2011.06.09_20AM.jpeg

ईडीला उच्च न्यायालयाचा दणका..सरनाईकांच्या संबधित याचिका फेटाळली

योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (ED) दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

मुंबई : एनएसईएल NSCL गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक याचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दिला होता. योगेश यांना काही दिवसापूर्वी ईडीने अटक केली होती. तर या प्रकरणात शिवसेनेचे सरनाईक यांनाही ईडीने समन्स बजावून अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले, मात्र सरनाईक न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने नाईक यांनी चैाकशीला येणं टाळलं आहे. 
 
या प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (ED) दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुमारे 5,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. देशमुख हे प्रताप सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी आता त्यांच्या मागावर असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता. 

प्लीज, मॅडम मला इथून घेऊन चला ; भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती
योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती. आज बुन्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांनी आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती, मात्र पुढे पीएमएलए कोर्टानं त्यांची जामीनावर सुटका केली होती.  हाच जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं जे फेटाळण्यात आलं आहे.

गजेंद्र पाटलांना आज पुन्हा ईडीनं चौकशीसाठी बोलावलं!
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे,  परिवहन विभागात झाल्ल्या घोटाळ्या संदर्भात त्याच बरोबर बदल्यांबाबत सुरू असलेल्या गैरव्यवहाराची दखल सक्त वसुली संचालनालयाने ED (ईडी) घेतली आहे. त्यानुसार या गैरव्यवहाराविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या गजेंद्र पाटील Gajendra Patil यांना आज पून्हा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार गजेंद्र पाटील हे अकराव्यांदा ईडी कार्यालयात येणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com