गजेंद्र पाटलांना आज पुन्हा ईडीनं बोलावलं! 

गजेंद्र पाटील हे अकराव्यांदा ईडी कार्यालयात येणार आहेत.
2Sarkarnama_20Banner_20_2813_29_0.png
2Sarkarnama_20Banner_20_2813_29_0.png

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे,  परिवहन विभागात झाल्ल्या घोटाळ्या संदर्भात त्याच बरोबर बदल्यांबाबत सुरू असलेल्या गैरव्यवहाराची दखल सक्त वसुली संचालनालयाने ED (ईडी) घेतली आहे. त्यानुसार या गैरव्यवहाराविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या गजेंद्र पाटील Gajendra Patil यांना आज पून्हा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार गजेंद्र पाटील हे अकराव्यांदा ईडी कार्यालयात येणार आहेत. 

नुकतीच वर्धा जिल्ह्याचे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची चौकशी झाली होती. पाटील याच्या आरोपांमध्ये परब यांचे नाव असल्याचीही चर्चाआहे.  परब यांना या पूर्वी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते गैरहजर राहिले. त्यामुळे पाटील याच्या चौकशीनंतर पून्हा परब याना ईडी समन्स बजावून बोलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

धक्कादायक : परमबिर सिंह यांनी दिली सायबर तज्ज्ञाला ५ लाखाची लाच
खरमाटेंच्या आठ तासांच्या चैाकशीनंतर गजेंद्र पाटील यांची ईडीने चैाकशी काल केली, आज पुन्हा त्यांनी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. पाटील यांनी केलेल्या तक्रारीत खरमाटेंसह अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या विरोधात कोट्यावधींची वसुली केल्याचा आरोप आहे. बदल्यांसाठी हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. 


खरमाटे यांनी सोमवारी आठ तास चैाकशी करण्यात आली होती. त्यानंतर पाटील यांना ईडीनं समन्स बजावलं होते. तपाात काही महत्वाची कागदपत्रे ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचे समजते. याबाबत अधिक चैाकशीसाठी त्यांना आज पुन्हा बोलावण्यात आले आहे. 

प्लीज, मॅडम मला इथून घेऊन चला ; भाजप खासदाराच्या सुनेची राष्ट्रवादीकडे विनंती
मुंबई :  वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (ramdas tadas) यांच्या सुनेनं तडस कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी हा व्हिडिओ टि्वट केला आहे. तडस यांच्या सुनंने आपल्याकडे मदतीची विनंती केली असल्याचे चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com