बैलगाडा शर्यतीला शेतकरी येणार, तालिबानी नव्हे ..पडळकरांची राष्ट्रवादीवर टीका

बैलगाडी नामशेष करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहेत.
3Sarkarnama_20Banner_20_202021_07_01T144443.268.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_07_01T144443.268.jpg

सांगली : बैलगाडी शर्यतीवर ची बंदी हटवावी या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी 20 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथे भव्य बैलगाडी छकडा bullock cart race शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.  मात्र, आजपासून पोलिस या ठिकाणी नाकाबंदी लावणार आहेत. 

''गोवंशाची शान आणि शेतकऱ्याची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहेत. राष्ट्रवादी NCP बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहून कोणीही तालिबान येणार नाहीत,'' अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते झरे (सांगली) येथे बोलत होते..

CBIचा छापा ; रेल्वे अभियंत्याला दोन लाखांची लाच घेताना अटक 
पडळकर म्हणाले की,  राष्ट्रवादी कॉग्रेसला दोन वर्षात ना तारीख काढली ना अद्यादेश काढता आला. जेव्हा मी शर्यत घ्यायचं ठरवलं त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्याबरोबर बैठक घेत आहेत. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या स्थानावर्ती नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. आज पासूनच सर्वत्र नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. तुमची दुटप्पी भूमिका शेतकऱ्यांना कळत आहे. जर बैलगाडी आणि शेतकऱ्यावर प्रेम असेल तर राजकारण करू नका. 

बैलगाडा शर्यतीसाठी बाळा भेगडेंचे फडणवीसांनाच साकडे
पिंपरी : बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी बैलगाडा मालकांनी व त्यांच्या संघटनेने आमदार, खासदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देताच लोकप्रतिनिधी आता सक्रिय झाले आहेत. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे बैलगाडामालक व संघटनेच्या प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. त्याला मावळचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील शेळके उपस्थित होते. त्यानंतर मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे Bala Bhegade यांनी त्यापुढे एक पाऊल टाकले आहे.
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com