CBIचा छापा ; रेल्वे अभियंत्याला दोन लाखांची लाच घेताना अटक 

आठ दिवसांपासून सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांचे पथक भुसावळात तळ ठोकून होते.
Sarkarnama Banner - 2021-08-17T102652.969.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-17T102652.969.jpg

भुसावळ : वर्कऑर्डर देण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना मध्य रेल्वेचा भुसावळ येथील विभागीय अभियंता एम. एल. गुप्ता व त्याच्या कार्यालयातील मुख्य कार्यालय अधीक्षक संजीव रडे याला ४० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने अटक केली. सोमवारी (ता. १६) दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्याच कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. यामुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

मलकापूर येथील एका कंत्राटदारास मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- १) एम. एल. गुप्ता यांनी दोन लाख तर, ओ. एस. संजय रडे यांनी ४० हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे मलकापूर येथील तक्रारदाराने नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती.
 IPSअधिकाऱ्यांच्या बदल्याचा घोळ मिटेना; तारीख पे तारीख
आठ दिवसांपासून पथक भुसावळात
गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांचे पथक भुसावळात तळ ठोकून होते. या पथकाने तक्रारीची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर सोमवारी सापळा लावून ही कारवाई केली. डीआरएम कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनातच लाच घेताना अधिकाऱ्यांना अटक केली. नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस. आर. चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

गुप्ताच्या घरातून ५० लाख जप्त
गुप्ता यांच्या कार्यालयात ही कारवाई होताच डीआरएम कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.  दुपारी दीडच्या सुमारास गुप्ता व रडे यांच्या घराच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले होते. सीबीआयच्या पथकाने गुप्ता याच्या निवासस्थानीही तपासणी केली. यात  ५० लाख रुपयांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com