शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात

पहिली पदे कोणी दिली? ३९ वर्षं सोबत होतो.
Many Shiv Sena MLAs in touch with me : Narayan Rane
Many Shiv Sena MLAs in touch with me : Narayan Rane

रत्नागिरी : ‘‘खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत शिवसेनेला बुडवणार आहेत. शिवसेनेत नाराज असलेले अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. भविष्यात महाराष्ट्रात आमचेच सरकार असेल. राणेंच्या पाठीमागे लागू नका, मी आत्ता थोडे बोलतोय, बोलायला लागलो तर ते तुम्हाला परवडणार नाही,’’ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिला. (Many Shiv Sena MLAs in touch with me : Narayan Rane)

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मी रत्नागिरी दौऱ्यावर असताना माझ्यावर केलेली कारवाई कायदेशीर नाही. जबरदस्तीने ती करण्यात आली. सत्तेची मस्ती दाखविण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कारवाई करा; पण कायदेशीर करा. कायद्याबाहेर जाऊन कराल तर सामोरे जावे लागेल, असे मंत्री राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. या वेळी भाजप नेते आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण, नीलेश राणे, जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : मोहिते पाटील गट पुन्हा हायकोर्टात जाणार 
 
राणे म्हणाले, ‘‘जनआशीर्वाद यात्रेमुळे लोकांचे प्रश्न जाणून घेता आले. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. कोकणच्या सुपुत्राला केंद्रात मंत्रिपद दिले. मी त्यांचा आभारी आहे. जनआशीर्वाद यात्रेसाठी रत्नागिरीत आलो. पूर, वादळ याची माहिती घेऊन शासनाकडून काही मदत मिळाली की नाही याची माहिती घेतली. याचा एकत्रित अहवाल पंतप्रधान मोदींना सादर करण्यात येणार आहे.’’

मी गुन्हेगार होतो, तर मुख्यमंत्री कसा झालो

कोरोनामुळे १ लाख २७ हजारांच्या वर माणसांचा मृत्यू झाला. देशात सर्वांत जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ही यांची ख्याती. बंधने फक्त नारायण राणे यांच्यासाठी. या देशात राहतो. आम्हाला मनाई का? सत्तेची मस्ती आहे, दुसरे काही नाही. कायदा सुव्यवस्था राज्यात नाही. खून, दरोडे, मारामाऱ्या होत आहेत. सुशांतसिंह हत्या, दिशा सालियन बलात्कार करून हत्या, यातील खरे आरोपी अजून मिळाले नाहीत. मी गुन्हेगार होतो, तर मग मुख्यमंत्री, मंत्री कसा झालो? पहिली पदे कोणी दिली? ३९ वर्षं सोबत होतो. सगळं ठाऊक आहे काय काय घडलंय ते. माझ्यावर बोलू नका. पुढचे आमदार, खासदार भाजपचे असती, याची काळजी घेऊ. शिवसेनेने कोकणाला काय दिलं? पुनर्वसन केलं नाही. त्यांचा कारभार जनतेला दाखवणार, असा इशाराही राणे यांनी दिला.
 
हेही वाचा : ..अन॒ शिवसेना-भाजपचे आमदार आले एकत्र!
 
आंबा-काजू बागायतदारांच्या समस्या घेतल्या जाणून

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची स्थगित यात्रा आज सुरू झाली. सकाळी विमानतळावरून शहरातील मारुती मंदिर येथे ते आले. तेथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. तेथून माळनाका येथे शामराव पेजे यांच्या पुतळ्याला हार घातला. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून राणेंनी गोळप येथे आंबा-काजू बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढे शहरातील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते पुढे हातखंबा, लांजा, राजापूरमार्गे सिंधुदुर्गला रवाना झाले.
 
तेव्हा बाळासाहेबांनी सुपुत्राला बरोबर घेतले नाही

बाळासाहेबांना अतिरेकी धोका होता, तेव्हा मातोश्री सोडायला सांगितली. या वेळी त्यांनी सुपुत्राला बरोबर घेतले नाही. का ते विचार करा आणि आता काय, तर घरावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचा नव्हे, चिव सैनिकांचा सत्कार झाला. वा! आता थोडं थोडं काढणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com