मोहिते पाटील गट पुन्हा हायकोर्टात जाणार 

आम्हाला त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचे आहे.
Mohite Patil's group will go to High Court again against the decision of Collector
Mohite Patil's group will go to High Court again against the decision of Collector

सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जी कागदपत्रे सादर केली नाहीत, पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावे, अशी मागणी मोहिते पाटील गटाने मागील सुनावणीत केली होती. त्यांची ही मागणी नामंजूर केली असून या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, आम्हाला मुदतवाढ द्या, अशी मागणी आजच्या सुनावणीत करण्यात आली आहे. (Mohite Patil's group will go to High Court again against the decision of Collector)
 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी बंडखोरी केली होती. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत मोहिते-पाटील गटाच्या वकिलांनी ही मागणी केली आहे. आजच्या सुनावणीला मोहिते-पाटील गटाकडून जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सुनंदा फुले व मंगल वाघमोडे हे तिघेच उपस्थित होते. यापूर्वीच्या सुनावणीत तक्रारदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 

या प्रकरणी मोहिते-पाटील गटाचे वकील ऍड. दत्तात्रेय घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका दर्शवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या निकालाची प्रत मिळण्यास विलंब झाला आहे. आम्हाला त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचे आहे, त्यामुळे आम्हाला मुदत द्या, अशी मागणी आजच्या सुनावणीत करण्यात आली आहे. 

शीतलदेवी मोहिते-पाटलांचे नाव कमी करा 

अकलूजचे रुपांतर नगरपरिषदेत झाले आहे, त्यामुळे या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते पाटील यांचे सदस्यत्व रिक्त झाले आहे. अकलूज नगरपरिषद होत असताना तुमचे सदस्यत्व जात असल्याबाबतची विचारणा करण्यात आली होती. माझे सदस्यत्व गेले तरीही हरकत नाही; परंतु अकलूजला नगरपरिषद झाली पाहिजे, अशी भूमिका शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी घेत नगरपरिषद स्थापनेसाठी लेखी ना हरकत दिली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व गेल्याने त्यांचे नाव या प्रकरणातून वगळावे, अशी मागणीही मोहिते-पाटील गटाचे ऍड. घोडके यांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी शंभरकर काय निर्णय घेतात? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in