....अन॒ शिवसेना-भाजपचे आमदार आले एकत्र!

शिवसेना पक्षाचे धोरण हे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आहे.
Joint meeting of Shiv Sena-BJP MLAs for water
Joint meeting of Shiv Sena-BJP MLAs for water

सांगोला (जि. सोलापूर) : राज्यात एकीकडे शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. परंतु टेंभु योजनांच्या पाण्यासाठी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी एकत्रीत बैठक घेऊन या दोन मतदारसंघातील पाणी प्रश्नाबाबत आढावा घेतला. (Joint meeting of Shiv Sena-BJP MLAs for water)

या बैठकीसाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडीयार, उपअभियंता गायकवाड, केंगार यांच्यासह  शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयात आज शुक्रवारी (ता. 27) झाली. या बैठकीत टेंभु योजनेतील पाण्यासाठीचे नियोजन करण्यात आले.

हेही वाचा : मोहिते पाटील गट पुन्हा हायकोर्टात जाणार 
 
या परिसरात गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने पाण्याची कमतरता भासली नव्हती. मात्र चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टेंभूचे आवर्तन 16 तारखेपासून सुरू केले असून लाभक्षेत्रातील गावांना मागणीप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. बुद्धेहाळ तलाव भरून घेण्यात येईल व माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी बैठकीमध्ये केल्या.

पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील माण नदीवरील चार बंधारे भरून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यकारी अभियंता राजन रेडीयार यांनी मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी देऊ व पाणीपट्टीची थकबाकी रक्कम लवकरात लवकर शेतकर्‍यांनी भरण्याची विनंती केली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, संभाजी आलदर, पंचायत समितीचे सदस्य सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ, दगडू बाबर, साहेबराव शिंदे, विकास मोहिते, जगदीश पाटील, शहाजी घाडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 

शिवसेना पक्षाचे धोरण हे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आहे. पाणी हा सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्न सोडविण्याबाबत मी कधीच राजकारण करणार नाही. प्रलंबित योजनांचे पाणी तालुक्याला मिळविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील.

-शहाजी पाटील,  आमदार, सांगोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com