BJP leader Suresh Avati meet to Jayant Patil
BJP leader Suresh Avati meet to Jayant Patil

भाजप नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट; एकाच गाडीतून केला प्रवास

दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी अनेक जण राष्ट्रवादीत घरवापसी करण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले होते.

सांगली : भारतीय जनता पक्षाचे मिरजेतील नेते सुरेश आवटी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. दोघांनी सांगली ते आरेवाडीपर्यंत एकाच गाडीतून प्रवास केला. सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. (BJP leader Suresh Avati meet to Jayant Patil)

सांगली महापालिकेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करून सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर आता स्थायी समितीच्या सभापतीची निवड होऊ घातली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत, तर काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे सभापती भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र तरीही भाजप सावध भूमिकेत आहे. 

भारतीय जनता पक्षाकडून नव्याने स्थायी समितीमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये सुरेश आवटी यांचे सुपुत्र निरंजन आवटी यांचाही समावेश आहे. त्यामुळे ते स्थायी सभापती पदावर दावा सांगणार हेही उघड आहे. मात्र गेली दोन वर्षे सलग सभापतिपदे मिरजेला गेल्याने आता पुन्हा मिरजेला सभापतीपद येणार का अशीही एक चर्चा सुरू आहे. सुरेश आवटी यांचे दुसरे पुत्र संदीप यांना याआधी स्थायी समितीचे सभापतिपद मिळालेले आहे. 

स्थायी समिती सदस्य निवडीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव फसला होता. पण तो प्रयोग पुन्हा होऊ शकतो. शिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यास उत्सुक आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अनेक जण राष्ट्रवादीत घरवापसी करण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवरही सुरेश आवटी यांनी पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र त्यांच्या भेटीचा तपशील कळू शकलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com