अजितदादांच्या जीवावर मोठे झालेले स्वार्थापोटी शिवसेनेत गेले अन्‌ पार्थ पवारांविरोधारात प्रचार केला

अशा दलबदलू, स्वार्थी आणि घरभेदी संचालकांना घरी पाठवा.
Ramchandra Hagwane's criticism of Atmaram Kalate, Ramchandra Thombare
Ramchandra Hagwane's criticism of Atmaram Kalate, Ramchandra Thombare

पौड (जि. पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवावर मोठे झालेले पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक स्वार्थापोटी शिवसेनेत गेले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात उघडपणे काम केले. आता राष्ट्रवादीला चांगले दिवस आल्यानंतर पुन्हा संधी साधू पाहत आहेत. अशा दलबदलू, स्वार्थी आणि घरभेदी संचालकांना घरी पाठवा, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे यांनी आत्माराम कलाटे आणि रामचंद्र ठोंबरे यांना नाव न घेता टोला लगावला. (Ramchandra Hagwane's criticism of Atmaram Kalate, Ramchandra Thombare)

मुळशी तालुक्यातील कोळवण येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात हगवणे बोलत होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीतील गद्दारांबरोबरच विरोधकांवरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध संघावरील अकार्यक्षम आणि वयोवृद्ध संचालकांमुळे मुळशी तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून जनविकास रखडला आहे. त्यामुळे  सर्वसामान्यांच्या विकासाचे धोरण असलेल्या सहकारात आगामी निवडणुकीत मुळशीकरांनी पक्षनिष्ठा असलेल्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी. 

माजी सभापती महादेव कोंढरे म्हणाले की, सहकार क्षेत्रात पक्षाच्या चिन्हांपेक्षा निष्ठा आणि तळमळीच्या विचारावर पॅनेल तयार होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांचे पक्षनिष्ठा असलेले संचालक मुळशी तालुक्यातून पाठवायचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घड्याळ आणि शरद पवार यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, सुनील चांदेरे, नीलेश पाडाळे, विलास अमराळे, प्रवीण धनवे, माऊली साठे, बबनराव धिडे यांचीही भाषणे झाली. युवक राष्ट्रवादीच्या वतीने 72 महिलांना पन्नास टक्के सवलतीत पीठगिरण्यांचे वाटप करण्यात आले. 

जनसंपर्क कार्यालयाचेही या वेळी उद्‌घाटन करण्यात आले. अंकुश टेमघरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पांडूरंग ओझरकर, कोमल वाशिवले, वैशाली गोपालघरे, पोपट दुडे, दगडूकाका करंजावणे, अंकुश मोरे, पोपट दुडे, भगवान नाकती, विठ्ठल पडवळ, लहू चव्हाण, काळूराम आखाडे, भरत सातपुते, ज्ञानोबा मांडेकर, अशोक साठे, संतोष साठे तसेच कोळवण खोऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com