भक्तोंको जेल, मंदिरोंको ताला, उद्धव सरकार में शराब का बोलबाला!

मद्यधुंद वागण्याने व राहण्याने कोरोना पसरत नाही, असे सरकारचे मत असेल तर पवित्र भावनेने तसेच शुद्ध अंतःकरणाने रांगेत व शिस्तबद्ध दर्शन घेण्याने कोरोना पसरतो असा निष्कर्ष काढणे हे कितपत योग्य आहे.
BJP's agitation in Akkalkot to open Swami Samarth's temple
BJP's agitation in Akkalkot to open Swami Samarth's temple

अक्कलकोट : कोरोनाचा विळखा ढिला होत असून राज्यातील मदिरालये दिवसरात्र उघडी ठेवली आहेत; पण मंदिरांचं काय, असा सवाल करीत अक्कलकोट भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले. (BJP's agitation in Akkalkot to open Swami Samarth's temple)

संपूर्ण राज्यासह देशविदेशातील भाविक अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे सरकारने बंदी ठेवली आहेत, त्यामुळे भाविकांच्या सेवा साधनांमध्ये अडथळे येत आहेत. तसेच मंदिर परिसरावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोट्यवधी रुपये गुंतवून उघडलेले लॉज व हॉटेल ओस पडले आहेत. या सर्व घटकांवरील संकट दूर करण्यासाठी मंदिरे तातडीने सुरू करा, अशी भाजपची मागणी आहे. 

या वेळी मंदिरे बंद गरिबांचे हाल; तर ठाकरे सरकार मालामाल, भक्तोंको जेल, मंदिरोंको ताला, उद्धव सरकार में शराब का बोलबाला, मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार, असा नारा देत तसेच विविध भजने गात शंखनाद करून आंदोलन करण्यात आले. 

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, राज्यातील दारू दुकाने, डान्सबार तसेच सर्वच अवैध धंदे दिवसरात्र सुरू असतात. अशा मद्यधुंद वागण्याने व राहण्याने कोरोना पसरत नाही, असे सरकारचे मत असेल तर पवित्र भावनेने तसेच शुद्ध अंतःकरणाने रांगेत व शिस्तबद्ध दर्शन घेण्याने कोरोना पसरतो असा निष्कर्ष काढणे हे कितपत योग्य आहे, याचा विचार सरकारने करावा आणि लवकरात लवकर मंदिरे सुरू करावीत. 

अक्कलकोट येथील धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविकांच्या दर्शनाबरोबरच या परिसरातील लाॅजेस, पूजा साहित्याची दुकाने, ग्रंथांची दुकाने, नारळ व हार, हॉटेल व चहा कॅन्टीन, खाद्य स्टॉल यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभर गुरुवारी, तसेच पालखी सोहळा व उत्सव यावेळी अक्कलकोट येथे भाविकांची गर्दी असते. मंदिरावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत; पण मंदिरच बंद असल्याने या सर्वांची आर्थिक ओढाताण होत आहे, ती कमी करण्यासाठी काही सुरक्षेचे नियम घालून देवस्थाने सुरू करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, प्रभाकर मजगे, परमेश्वर यादवाड, अंबण्णा चौगुले, ऋषी लोणारी, अंकुश चौगुले, अतिष पवार, आनंद पवार, संजय राठोड, कांतू धनशेट्टी, रमेश कापसे, नन्हू कोरबू, सागर डिग्गे, स्वामीनाथ घोडके, नागराज कुंभार, बाळासाहेब शिंदे, बबलू कामनूरकर, विनोद मोरे,आशिष पवार,राहुल वाडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com