नारायण राणे म्हणाले, `छगन भुजबळ काहीही बोलतात..." 
Narayan Rane-Bhujbal

नारायण राणे म्हणाले, `छगन भुजबळ काहीही बोलतात..." 

यांना कायदाच माहीत नाही. फक्त आम्ही काही तरी करतो, असे दाखवून ते चमकायला जातात, अशी टीका राणे यांनी केली.

नवी दिल्ली : केंद्र सरकार ओबीसींचा (OBC) एम्पिरिकल डाटा देत नाही, या अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या आरोपाला केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane), यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, "भुजबळ काहीही बोलतात. त्यांना दुसरे काही दिसत नाही. ते जे बोलतात, ते त्यांचे अज्ञान आहे. (Narayan Rane criticizes Chagan Bhujbal)

मराठा आरक्षणावर बोलतांना राणे म्हणाले, आरक्षणाची मर्यादा घटनेच्या चौकटीत वाढविण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. ते मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देऊ शकतात. पण त्यांना कायदाच समजलेला नाही. काहीजण केवळ चमकायला जातात, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले. याबाबत पत्रकार परिषदेत विचारले असता राणे म्हणाले, "इंदिरा सहानी प्रकरणात 52 टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित झाली आहे. आता ती वाढविण्याची गरजच आहे का? भारतीय‌ राज्यघटनेच्या 15/4 आणि 16/4 प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करून राज्य‌ सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, तो कुणी काढून घेतलेला नाही. आरक्षणाच्या मर्यादा ओलांडण्यासाठीच या तरतुदी आहेत. दहा ते बारा राज्यांनी 52 टक्क्यांपेक्षा आरक्षण दिले आहे. त्यांनी कसे दिले? असा सवाल राणे यांनी करत, पुढे म्हणाले, यांना कायदाच माहीत नाही. फक्त आम्ही काही तरी करतो, असे दाखवून ते चमकायला जातात."

ते पुढे म्हणाले, मराठ्यांचे सामाजिक, शैक्षणिक मागसलेपण किती आहे, याचे सर्वेक्षण तर आधी करा, मागासलेपण सिद्ध केल्यानंतर राज्य हे आरक्षणाचा प्रस्ताव पाठवू  शकते, असे राणे यांनी स्पष्ट केले. याबरोबरच ते म्हणाले,  केंद्र सरकार कोणतीही माहिती लपवून ठेवू शकत नाही. हे केंद्रावर आरोप कसे करू शकतात? याला म्हणतात, नाचता येईना, अंगण वाकडे, अशी टीका सुद्धा राणे यांनी यावेळी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in