मोठी बातमी : मुंबई वगळता पुणे, पिंपरी, सोलापूर, कोल्हापुरात द्विसदस्यीय प्रभाग?

मंत्रिमंडळबैठकीतअंतिम निर्णय होणार आहे.
Two-member ward system for elections in Pune, Pimpri, Kolhapur, Solapur
Two-member ward system for elections in Pune, Pimpri, Kolhapur, Solapur

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यभरातील १८ महापालिकांची मुदत संपवून निवडणुका घेण्याचे वेळापत्रक जेमतेम साडेचार महिन्यांवर आल्याने या निवडणुकांसाठी प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक येत्या मंगळवारी (ता. २१ सप्टेंबर) होणार आहे. त्यानंतर लगेचच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होऊन प्रभाग पद्धती ठरण्याची शक्यता आहे. (Two-member ward system for elections in Pune, Pimpri, Kolhapur, Solapur)

मुंबई वळगता पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूरसह काही महापालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग राहणार असल्याचेही जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्यात मुदत संपलेल्या आणि येत्या फेब्रुवारीपर्यंत (२०२२) मुदत संपणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यांत दिला. 

ही रचना सरकारच्या ३१ डिसेंबर २०१९ च्या काद्यानुसार एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल आणि तशीच प्रभागरचना करण्याची सूचना आयोगाने महापालिका आयुक्त केल्या आहेत. पण, सर्वच महापालिकांसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती नसेल, त्यात काही बदल होईल आणि त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० दिवसांपूर्वी सांगितले आहे. 

दुसरीकडे, प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची कामे महापालिकांच्या पातळीवर सुरू असतानाच प्रभाग पद्धतीत बदलाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या कामात अडचणी आल्या आहेत. तर प्रभाग नेमका कसा असेल, यावरून राजकीय पक्ष आणि त्यांच्याकडील इच्छुकही गोंधळे आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकांची मुदत, त्याआधीची आचारसंहिता आणि राजकीय पक्षांच्या पातळीवरील तयारीसाठी वेळ पाहता प्रभाग रचना ठरविण्याचा मुहूर्त लागला आहे. नव्या प्रभाग पद्धतीसाठी तीनही पक्षांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. 

तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेणार

राज्यभरातील बहुतांशी महापालिकांमधील भाजपचे वर्चस्व कमी करून आपापली ताकद वाढविण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रयत्न करीत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरून या तीनही पक्षांत एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, हे तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत कायद्यात बदल केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com