रावसाहेब...आज तुम्हाला शब्द देतो; मी तुमच्यासोबत आहे!

आमच्या स्टेशनवर येऊ शकता.
My support to Raosaheb Danve for Mumbai-Nagpur bullet train: Uddhav Thackeray
My support to Raosaheb Danve for Mumbai-Nagpur bullet train: Uddhav Thackeray

औरंगाबाद : ‘अपेक्षांशिवाय आयुष्य असूच शकत नाही. रावसाहेब मी सगळ्यासमोर तुम्हाला शब्द देतो. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल तर हे सरकार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मजुबतीने उभा राहणार आहे. आमची अशी इच्छा आहे की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनपेक्षा आमच्या राज्याची राजधानी आणि उपराजधानीस जोडणारा महामार्ग होणार असेल तर आज मी तुम्हाला शब्द दिला की, तुम्ही प्रेझेंटेशन नाही दिले तरी चालेल; पण मी तुमच्या सोबत आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या दोन्ही शहराला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. (My support to Raosaheb Danve for Mumbai-Nagpur bullet train: Uddhav Thackeray)

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदनानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी दानवे यांना वरील आवाहन केले. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आपल्या भाषणात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती मुख्यंमत्र्यांना केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर मी तुमच्यासोबत आहे.

`मला रेल्वे का आवडते. कारण, रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं, तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असा चिमटादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दानवे यांना काढला.  

दरम्यान, भाषणात सुरूवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, `मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकार`, असा उल्लेख रावसाहेब दानवे यांच्याकडे कटाक्ष टाकत केला. असा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी भाजपला टाळी दिल्याची चर्चा रंगली होती.  तुम्ही रेल्वे राज्यमंत्री आहात, रेल्वेचा मार्ग कसा सरळ असतो, पण त्यालादेखील युटर्न असतो, तो तुम्ही घेऊ शकता आणि आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच मला माजी मंत्री म्हणून नका हो, तीन दिवसांनी काय होईल ते पहा, असे विधान नुकतेच केले होते. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी देखील एकत्रित येण्याचे संकेत देत भाजपच्या नेत्यांना साद घातल्याचे दिसून आले. ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही, तर भाजपच्या गोटात आनंद होईल असे दुसरे विधान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com