सोलापूरनंतर आता औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा एमआयएमला दणका 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
MIM corporator Sajeda Saeed Farooqui joins NCP
MIM corporator Sajeda Saeed Farooqui joins NCP

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्याच्या विविध भागातील नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. आता औरंगाबाद येथील एमआयएमच्या नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारूकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. (MIM corporator Sajeda Saeed Farooqui joins NCP)

राज्यात सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्याला आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यासह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचीही पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्याकडे लक्ष दिले आहे.

औरंगाबाद येथील एमआयएमच्या नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारूकी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी औरंगाबादचे शहराचे पक्षाचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख व प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. यापूर्वी सोलापुरातही राष्ट्रवादीने एमआयएमचे नगरसेवक फोडले आहेत.

दरम्यान, लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनीही काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत जाणे पसंत केले आहे. 

अजित पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचनाही केली. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.

आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पवार यांनी त्यांना केले होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com