राजकारणात काहीही होऊ शकतं... ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची गुगली

ते कशा प्रकारच्या लोकांबरोबर सरकार चालवत आहेत, हे ठाकरे यांच्या लक्षात आलं असावं.
Devendra Fadnavis said on Uddhav Thackeray's statement
Devendra Fadnavis said on Uddhav Thackeray's statement

मुंबई : ‘‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण भारतीय जनता पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही कोठेही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही आहोत. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावत आहोत. ही अनैसर्गिक महाविकास आघाडी फार काळ चालू शकणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कदाचित लक्षात आलं असावं की अशा प्रकारची अनैसर्गिक आघाडी करून महाराष्ट्राचे नुकसान होतंय. त्यामुळे ठाकरे यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली असेल,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘भावी सहकारी’ म्हणून भाजप नेत्यांच्या उल्लेखावर प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis said on Uddhav Thackeray's statement ....)

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदनानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा साद घातल्याचे दिसून आले. व्यासपीठावार उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असा उल्लेख करत ठाकरे यांनी भाजपला टाळी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणतात की, दोन दिवस थांबा बघा काय होतेय ते आणि उद्धव ठाकरे भाजप नेत्यांचा भावी सहकारी म्हणून उल्लेख करतात, यावर फडणवीस म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, आज मला ते दिसत नाही. सरकार बनविण्यासाठी आम्ही उथावीळ नाही. आम्ही सरकारच्या विरोधात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. राज्यातील जनतेच्या इच्छा, आकांक्षा घेऊन भाजप आंदोलन करत आहे. सरकारला उत्तरदायित्व काय असते, ते शिकवत आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून एवढाच अर्थ काढता येईल की ते कशा प्रकारच्या लोकांबरोबर सरकार चालवत आहेत, हे ठाकरे यांच्या लक्षात आलं असावं.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याबाबत बोलताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याच्या हक्कांवर गदा आणू नये, असे म्हटले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्याला विरोध करून आपली दुटप्पी भूमिका उघड केली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर ते २० ते २५ रुपयांनीसुद्धा स्वस्त होऊ शकेल. मात्र, त्याला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलणे बंद करावे. जीएसटीत पेट्रोल डिझेल आणण्यास विरोध केल्यास आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करू, असा इशाराही फडणवीस यांनीया वेळी बोलताना दिला. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदनानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा साद घातल्याचे दिसून आले. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले, `मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकार`, असा उल्लेख रावसाहेब दानवे यांच्याकडे कटाक्ष टाकत केला. तुम्ही रेल्वे राज्यमंत्री आहात, रेल्वेचा मार्ग कसा सरळ असतो, पण त्यालादेखील यूटर्न असतो, तो तुम्ही घेऊ शकता आणि आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

रावसाहेब मी तुमच्यासोबत...
रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती मुख्यंमत्र्यांना केली, त्याला माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग, मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

`मला रेल्वे का आवडते. कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असा चिमटादेखील ठाकरे यांनी आपल्या भाषणातून काढला. राज्य आणि देशपातळीवर भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप,वादविवाद सुरू असताना या कार्यक्रमातील वातावरण मात्र अत्यंत खेळीमेळीचे होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com