हरी नरके म्हणतात, फडणवीस अन् शेलारांची वकिलीची पदवी बोगस असली पाहिजे!

वकिलीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यानांही घटनेतील कलम १४२ बद्दल माहिती असते. पण जर त्यांना हे माहिती नाही असा जर अर्थ घेतला तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस असल्या पाहिजेत, असा त्याचा अर्थ होतो.
hari narake.jpg
hari narake.jpg

मुंबई:  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  आणि आशिष शेलार (Ashish Shelar)  यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस  आहेत, असा आरोप प्रा. हरी नरके (Pro. Hari Narake)  यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात फडणवीस आणि शेलार राज्यातील नागरिकांची फसवणूक आणि दिशाभूल करतअसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने  4 मार्च 2021 रोजीच्या सुनावणी दरम्यान ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द केलं. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिकाही  दाखल केली होती. मात्र 29 मे 2021 ला न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं. या निर्णयाबाबत  हरी नरके यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

काय म्हटलं आहे हरी नरके यांनी? 

''पंचायत राजमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे, तो निकाल देताना न्यायालयाने परिच्छेद  २६ मध्ये असे स्पष्ट केले आहे की, राज्यघटनेच्या कमल १४२ मध्ये सर्वोच्च न्यायालयााला दिलेले जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करुनच न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याचा असा अर्थ होतो की, हा निकाल सर्व देशाला लागू झाला आहे. या निर्णयामुळे देशातील सर्व राज्यातील ओबीसींचे पंचायत राजमधील आरक्षण रद्द करण्यात आले  आहे. 

राज्यघटनेतील कलम १४२ अंतर्गत हा निकाल दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार जनतेची दिशाभूल करत आहेत. या निकालानुसार फक्त महाराष्ट्रातील आरक्षण गेले आहे, इतर राज्यातील आरक्षण शाबूत आहे, असा प्रचार  फडणवीस आणि शेलार हे दोघे करत आहेत. हे दोघेही  वकील असल्याचं सांगितलं जात. मात्र वकिलीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यानांही घटनेतील कलम १४२ बद्दल माहिती असते.  पण जर त्यांना हे माहिती नाही असा जर अर्थ घेतला तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस असल्या पाहिजेत, असा त्याचा अर्थ होतो. 

पण त्यांना माहिती असूनही अज्ञानाचे सोंग घेऊन जर ते नागरिकांची दिशाभूल कऱणारा आणि खोटा  प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाची अवमानना (Contempt of court) अंतर्गत केसेस दाखल केल्या पाहिजेत आणि जर त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस असल्या पाहिजेत, असा आरोप हरी नरके यांनी  केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com