भुजबळ म्हणाले, दानवेंना शिवसेनेत यायचं असेल तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख 'भावी सहकारी' असा केला आहे.
Chhagan Bhujbal targets Union Minister Raosaheb Danve
Chhagan Bhujbal targets Union Minister Raosaheb Danve

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख 'भावी सहकारी' असं केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून राजकीय वर्तूळात शिवसेना व भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दानवे यांचीच फिरकी घेतली आहे. (Chhagan Bhujbal targets Union Minister Raosaheb Danve)

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, 'चांगले आहे. राजकारणात वैचारिक मतभिन्नता असते पण सगळे मैत्री जपतात. विरोधी पक्षातील नेते कुणाचे दुश्मन नसतात, मित्रच असतात. त्यामुळं कदाचित रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर...,' असं म्हणत भुजबळांनी गुगली टाकली. मुंबई पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी हे विधान केलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमुळं मुख्यमंत्र्यांना त्रास होत असल्यानं ते असं बोलले असावेत, असं म्हटलं आहे. भुजबळ यांनी या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. युतीची सत्ता असताना भाजपनं शिवसेनेला कसा त्रास दिला हे सर्वांना माहित आहे. महाविकास आघाडीला धोका नसून इतरांना धोका असू शकेल. आघाडीत मुख्यमंत्र्यांना काहीही त्रास नसल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. 

राज्यपालांनी स्वाक्षरी केली

ओबीसी आरक्षणाबाबत मंत्रिमंडळात अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे आज देण्यात येणार आहे. राज्यपाल त्यावर तातडीने स्वाक्षरी करतील, अशी आमची विनंती आहे. हा अध्यादेश मंजूर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडं पाठवला जाईल. आयोग स्वायत्त आहे. त्यामुळं ते काय भूमिका घेतात, ते बघावे लागेल, असे भुजबळ यांनी सांगितलं. 

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी माजी मंत्री म्हणून नका, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दानवे यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला आहे. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सलग दोन दिवसांत दोन बड्या नेत्यांकडून अशी वक्तव्य आल्यानं पुन्हा युतीच्या चर्चा झडू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com