जितेंद्र आव्हाड संतापले : कळव्यातील पाणीटंचाईवरून अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

कळवा शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
जितेंद्र आव्हाड संतापले : कळव्यातील पाणीटंचाईवरून अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
jitendra avhad.jpg

ठाणे : ऐन पावसाळ्यात कळवा शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

कळवा शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी ही समस्या सोडविण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

हेही वाचा...

या वेळी 35 एमएलडी पाणी लगेच देता येत नसेल, तर किमान 32 एमएलडी पाणीपुरवठा कळव्यातील नागरिकांना झालाच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यापूर्वीही पाणीसमस्येबाबत बैठका घेऊनदेखील पाण्याचा प्रश्न फारसा सुटला नसल्याने आव्हाड यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

कळवा-मुंब्रा भागात गेले काही दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दाखल घेत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा...

त्यात कळवा परिसरासाठी 35 एमएलडी पाणीपुरवठा करण्यास मान्यता असताना अवघा 23 एमएलडीच पाणीपुरवठा का करण्यात येत आहे, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.


मंजूर कोट्यापेक्षा कळवा परिसरात कमी पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा तत्काळ वाढवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. कल्याण फाट्यापर्यंत पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून त्यामुळे कळव्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in