ओबीसी आरक्षणाबाबत निश्चित योग्य मार्ग निघेल - अजित पवार

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ग्रामविकास विभाग तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय व डेहराडूनचा भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या विद्यमाने तालुक्यात गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
ओबीसी आरक्षणाबाबत निश्चित योग्य मार्ग निघेल - अजित पवार
Ajit pawar.jpg

बारामती : ओबीसी संदर्भातील आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा तयार झाल्यानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात, असा सर्वपक्षीय सार्वत्रिक सूर असला तरी इतर पर्यायांची चाचपणी देखील राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला इम्पिरिकल डेटा तयार करण्याच्या सूचना दिल्या जाव्यात, असा निर्णय काल सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ग्रामविकास विभाग तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय व डेहराडूनचा भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या विद्यमाने तालुक्यात गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.

हेही वाचा...

अजित पवार म्हणाले, "ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार निश्चितपणे योग्य मार्ग काढेल, कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ न देण्याचे धोरण मुख्यंमत्री उध्दव ठाकरे व सरकारचे असून ओबीसी आरक्षणाबाबत योग्य मार्ग निघेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत दिली. 
 
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकालात निघत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नयेत या भूमिकेवर सर्वच पक्ष व सरकारचही एकमत आहे. समाजातील प्रत्येक घटकालाच न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, ओबीसी आरक्षणाबाबतही नक्की चांगला मार्ग निघेल. 

मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक, बहुजन या पैकी कोणत्याच घटकावर अन्याय होणार नाही या साठी सरकार ठाम आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल," असे अजिप पवार यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान गेल्या पाच वर्षात सत्ता नसल्याने बारामतीचा विकास ज्या वेगाने करायचे ठरविले होते तितक्या वेगाने तो होऊ शकला नाही याची खंतही अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली. गेल्या पाच वर्षात सत्ता असती तर  कोरोनाचे सावट असले तरी विकासकामांवर परिणाम होऊ द्यायचा नाही या नेटाने आम्ही सर्व जण काम करीत असल्याचे पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान राहुल बजाज यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दाचा मान ठेवत दहा कोटी रुपयांच्या दीड लाख लसी विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी बजाज समूहाचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in