स्वयंघोषित कोकण सम्राट कोकणातच चीत - उद्योगमंत्री सुभाष देसाई 

विनायक दरंदलेसोनई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी राणेंविरोधात पोलिसांत फिर्यादी दिल्या होत्या. त्यामुळे राणे यांना अटकही झाली होती. राज्यात मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
स्वयंघोषित कोकण सम्राट कोकणातच चीत - उद्योगमंत्री सुभाष देसाई 
subhash desai.jpg

सोनई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी राणेंविरोधात पोलिसांत फिर्यादी दिल्या होत्या. त्यामुळे राणे यांना अटकही झाली होती. राज्यात मुंबईसह पाच महापालिकांच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सहा कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या सोनई-घोडेगाव रस्त्याचे भूमिपूजन शनिचौकात राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. आंबराई विश्रामगृह येथे झालेल्या 'शिवसंवाद' या कार्यक्रमात देसाई यांनी उपस्थित जनसुदायाशी संवाद साधला. या प्रसंगी मंत्री गडाख, शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

या प्रसंगी सुभाष देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "स्वतःला कोकण सम्राट म्हणून मिरवणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांची कोकणातील एका तालुक्याच्या गावात बत्तीगुल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला साजेसा असाच दणका दिला आहे. स्वयंघोषित कोकण सम्राट कोकणातच चीत केला. नारोबा! 'सौ सोनारकी एक लोहार की'. नारोबाला अटक होत होती त्यावेळी वाचवायला भाजपचा एकही मोठा नेता आला नाही. अटक होताना सटरफटर, पालापाचोळाच होता.

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वारसा घेवून शिवसेनेत आलेले शंकरराव गडाख जिल्ह्यात पक्षाला मोठी उंची देतील असा विश्वास व्यक्त केला. पांढरीपुल एमआयडीसी बरोबरच जिल्हा व तालुक्यात उद्योगाला अग्रक्रम दिला जाईल, असे आश्वासनही सुभाष देसाई यांनी दिले.

हेही वाचा...

जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. मंत्री गडाख यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यात राबविलेल्या शिवसंवाद उपक्रमाची माहिती देत तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताचे कामे होत आहेत. उद्योग मंत्रालयाद्वारे तालुक्याच्या विकासाला चालना दिली जाईल असे सांगितले. 

कार्यक्रमास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. खेवरे यांनी आभार मानले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in