त्या पक्ष्यांचे मारेकरी कोण?

अमरधाममध्ये असलेल्या विद्युत दाहिनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी पडल्याचे आढळून आले होते. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे पाहता महापालिकेने विद्युत दाहिनीचा विस्तार सुरू केला आहे.
Crime.jpg
Crime.jpg

नगर ः नगर शहरातील नालेगाव अमरधाममध्ये विद्युत दाहिनी आहे. या विद्युत दाहिनीच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी महापालिकेने एक बाभळीचे वृक्ष तोडले. वृक्ष तोडताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली नाही. त्यामुळे 9 पक्षांचा मृत्यू झाला तर तीन पक्षी गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाच्या कायद्यानुसार पक्षी मारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आता महापालिकाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहण्याची शक्यता आहे.

अमरधाम सीना नदीच्या काठी आहे. अनेक पक्षी या सीना नदी काठच्या वृक्षांवर घरटी करून राहतात. पक्षांच्या चिवचिवाटाने परिसरातील नागरिकांना जाग येते. अमरधाममध्ये महापालिकेने जतन व संवर्धन केले आहे. त्यामुळे पक्षी या वृक्षांवर आपली घरटी तयार करतात. अनेक पक्षांची वसाहतच या परिसरात आहे.

हेही वाचा...

अमरधाममध्ये असलेल्या विद्युत दाहिनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी पडल्याचे आढळून आले होते. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे पाहता महापालिकेने विद्युत दाहिनीचा विस्तार सुरू केला आहे. त्यासाठी महापालिकेने सोमवारी (ता. 16) एक बाभळं तोडली. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेहमी प्रमाणेच कोणताही सारासार विचार न करता काम फत्ते केलं. या बाभळीवर पक्षांची घरटी. त्यात काही अंडी, छोटी निरागस पिले व पक्षी होते. वृक्ष उन्मळताच त्यांची घरटीही जमिनीवर जोरात आपटली.

हेही वाचा...

यातील पान कावळे व बगळ्यांची पिले होती. घरटे जमिनीवर अपटल्याने पिले जखमी झाले. त्यांना दोन दिवस खायलाही मिळाले नाही. त्यामुळे 9 पक्ष्यांचा मृत्यू झाला. तीन पक्षी गंभीर जखमी झाले. जखमी असलेले तीनही पक्षी बगळ्याची पिले आहेत. त्यातील दोन पिलांची प्रकृती चिंताजनक आहे. ही बाब शहरातील पक्षीमित्र व निसर्गप्रेमी संघटनांना बुधवारी (ता. 18) कळवली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. वनविभागाचे अधिकारीही वेळ न दवडता आले. स्थळाची पाहणी केली. जखमी पक्षांना जिल्हा पशुचिकित्सालयात उपचारासाठी दाखल केले. यातील 9 पिलांचे शवविच्छेदन करण्यात आले. या विरोधात आता वनविभाग महापालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची शक्यता आहे. सामाजिक व निसर्गप्रेमी संघटनांनी महापालिकेवर कारवाईची मागणी केली आहे.

वृक्षतोड अधिकृत होती की अनधिकृत याची महापालिकेने शाहनिशा करावी. तसेच वृक्षतोडणाऱ्या संबंधितांवर महापालिकेने कारवाई करावी.

- मंदार साबळे, नेचर लव्हर्स क्लबचे पदाधिकारी, नगर.

 

नागरिकांनी वृक्ष अथवा फांद्या काढताना त्या फांद्यावर पक्षांची घरटी आहेत का हे पाहून घ्यावे. त्यानंतरच फांद्या काढण्याचा निर्णय घ्यावा. अमरधाम मधील बाब गंभीर असून या बाबत सखोल चौकशी करून संबंधितावर महापालिकेने कारवाई करावी.

- सुरेश खामकर, अध्यक्ष, हरियाली संस्था, नगर.

मी सध्या बाहेरगावी आहे. उद्या नगरला आल्यावर अमरधाममधील घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील निर्णय घेईल. सध्या जखमी पक्षांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न आहे.

- सुनील थेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com