अनुराधा नागवडे यांची चहाच्या गोड घोटापासून आमदारकीची तयारी

दिवंगत काँग्रेस नेते शिवाजीराव नागवडे यांच्या अनुराधा या सु्ष्ना आहेत. 'बापुं'चे राजकारण कायमच वेगळ्या शैलीत राहिले. ते मोटारीच्या काचा खाली घेत नसल्याचा आरोप विरोधकांनी सतत केला. त्यांनी या आरोपांना कधीच उत्तर दिले नाही.
Anuradha nagawade1.jpg
Anuradha nagawade1.jpg

श्रीगोंदे ः विधानसभा निवडणुकीला नक्कीच वेळ आहे मात्र निवडणुकीत उतरण्याचा निर्णय ऐनवेळी होतो. परिणामी विजय हुलकावणी देतो असेच काहीसे वाटल्याने यावेळच्या आमदारकीच्या प्रबळ उमेदवार समजल्या जाणाऱ्या काँग्रेस नेत्या अनुराधा नागवडे हटके फंडा वापरायला लागल्या आहेत. त्यांनी शहरातील शनिचौकातील गर्दीचे ठिकाण असणाऱ्या हाॅटेलमध्ये चहाचे घोट घेत कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधत 'है हम तैयार' अशीच काहीशी खुन्नस विरोधकांना देत लोकांमध्ये वेगळी छबी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले.

दिवंगत काँग्रेस नेते शिवाजीराव नागवडे यांच्या अनुराधा या सु्ष्ना आहेत. 'बापूं'चे राजकारण कायमच वेगळ्या शैलीत राहिले. ते मोटारीच्या काचा खाली घेत नसल्याचा आरोप विरोधकांनी सतत केला. त्यांनी या आरोपांना कधीच उत्तर दिले नाही. मात्र आजही 'बापू' हवे होते. हे सामान्यांचा काळजाला भिडणारे वाक्य त्यांची महती सांगून जाते.

हेही वाचा...

गेल्या दोन विधानसभा निवडणूका लढणार असे वाटत असतानाच तयारी नाही असे वाटल्याने थांबलेल्या  अनुराधा नागवडे यांनी मात्र यंदा निवडणूकीला अजून अवधी असतानाच मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'सकाळ'शी बोलताना त्यांनी मध्यंतरी 'होय, विधानसभा लढणार आणि जिंकणारही' असे सांगत विरोधकांना आव्हान दिले होते. त्याचा प्रत्यय आता येवू लागला आहे.

हेही वाचा...


अनुराधा नागवडे या महिलांप्रमाणेच तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील लोक भावी आमदार म्हणून पाहतात हे कार्यकर्ते थेटपणे बोलू लागले आहेत. मात्र नागवडे कुटूंब लोकांमध्ये जात नाही, बसत नाही हा आरोप खराही आहे. त्यालाच शह देण्यासाठी आता अनुराधा नागवडे यांनी निर्णय घेतल्याचे दिसते. शहरातील शनीचौक येथील चहासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपसरपंच चहाची गोडी चाखण्यासाठी त्या थेट हाॅटेलमध्ये गेल्या. तेथे जात लोकांशी संवाद तर साधलाच शिवाय बसून चहाही घेतल्याने मोठी चर्चा रंगली आहे. त्यांची असणारी सध्याची क्रेझ वेगळीच असून त्यांनी अशा पध्दतीने लोकांमध्ये जात संवाद साधले तर विरोधकांना लवकर जागे व्हावे लागेल हेही वास्तव आहे.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com