राज्य सरकारने मांडलेय भ्रष्टाचाराचे मेनूकार्ड - आमदार राधाकृष्ण विखे पाटील

विखे पाटील म्हणाले,कोरोनाच्या काळात राज्य सरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार मदत देत नसल्याचा कांगावा करीत आहे.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

कोल्हार ः राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कोणालाही नोकऱ्या देण्यासाठी अथवा बदल्या करण्याचे भाव हॉटेलमधील मेनू कार्ड प्रमाणे ठरले आहेत. राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले आहे़, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या १४ व्या व १५व्या वित्त आयोगातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा- प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक सुभाष जांनजी अंत्रे होते. यावेळी ॲड. अप्पासाहेब दिघे, रमेश पन्हाळे, सुभाष ना. अंत्रे, पाराजी धनवट, जे .पी .जोर्वेकर, सोनगाव व सात्रळचे सरपंच अनुक्रमे अनिल अनाप व सतीश ताठे, उपसरपंच किरण अंत्रे, कारभारी ताठे, साहेबराव नालकर, मच्छिंद्र अंत्रे, उपस्थित होते.

हेही वाचा...

विखे पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात राज्य सरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार मदत देत नसल्याचा कांगावा करीत आहे. आम्ही मात्र कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला, अशा वेळी राज्यातील मंत्री फक्त भजे खाण्यासाठीच बसलेत काय. आघाडी सरकारला कोणतेही चांगले काम करता आले नाही. नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहेत.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी रुग्णवाहिकासाठी वळविला. त्याला आमचा आक्षेप नाही .परंतु वित्त आयोगाचे पैसे पक्षासाठी व कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी वापरणे एवढेच काम पालकमंत्र्यांनी केले. यासारखे दुर्दैव नाही. निधी मिळविण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला घटनेने दिला आहे. त्यांला हात लावण्याचा कोणाला अधिकार नाही.

सरकारला जनताच नापास करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देण्यापलीकडे राज्य सरकार कोणतेच काम करत नाही. केंद्राने लस दिली म्हणूनच राज्य लसीकरणात पहिल्या क्रमांकावर गेले. सरकारने लाखो रुपयांची वीजबिले शेतकऱ्यांच्या माथी मारली .पीक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शाळा सुरू करण्याबाबत मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. धोरण समाजाला पूरक नसलेल्या सरकारला जनता आता नापास केल्याशिवाय राहणार नाही .असा इशारा विखे पाटलांनी दिला. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com