विखेंनी लसीकरण केंद्रावर फ्लेक्स बोर्डपेक्षा मंडप लावावे - प्राजक्त तनपुरे
nilesh lanke.jpg

विखेंनी लसीकरण केंद्रावर फ्लेक्स बोर्डपेक्षा मंडप लावावे - प्राजक्त तनपुरे

मंत्री तनपुरे यांनी भाजपचे लसीकरण मोहिमेवरून सुरू असलेले राजकारण व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वर टीका केली.

टाकळी ढोकेश्वर : वनकुटे (ता. पारनेर) येथे काल (रविवारी) वनकुटे ते वडगाव सावताळ रस्ता सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख रुपये, वनकुटे ते पठारवाडी रस्ता सुधारणा करणे कामी 50 लाख रुपये, हनुमान नगर येथे पाणी पुरवठा लाईन करणे 25 लाख रुपये, व्यायाम साहित्य 5 लाख रूपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, सभापती अण्णा सोंडकर, अ‍ॅड. राहुल झावरे, सोमनाथ वरखडे, दादा शिंदे, बापू शिर्के, विजय औटी, रवींद्र गायखे, सचिन पठारे, कारभारी पोटघन, सचिन मगर, किशोर यादव, डॉ. बाळासाहेब कावरे उपस्थित होते.

हेही वाचा...


मंत्री तनपुरे यांनी भाजपचे लसीकरण मोहिमेवरून सुरू असलेले राजकारण व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वर टीका केली. ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील भाजप खासदारांनी लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरणाचे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत मात्र या फ्लेक्स बोर्डपेक्षा तेथे नागरिकांच्या सोईसाठी मंडप लावले असते तर नागरिकांनी देखील आभार मानले असते.

अदिवासी विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यात विविध योजना राबविल्या पारनेर तालुक्यात खावटी योजना अदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी आमदार नीलेश लंकेनी प्रयत्न केले. मंत्रालयात सातत्याने आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार निलेश लंकेची कायम तळमळ असते. अळकुटी व पुणेवाडी येथील वीज उपकेंद्रातील अडचणी सह पारनेर तालुक्यातील विजेचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

हेही वाचा...

आमदार लंके म्हणाले, उर्जामंत्री तनपुरे यांनी वीज व अदिवासी विभागातून पारनेर तालुक्याला झुकते माप दिले आहे. खावटी योजनेच्या माध्यमातून कोरोना काळात अदिवासी समाजाला मोठे सहकार्य झाले.

लवकरच आमदार लंकेंनाही मंत्रीपद मिळेल
ज्या जिल्ह्यात चांगले काम चालते. तेथे ज्येष्ठ नेते शरद पवार दोन मंत्रीपदे देतात. अहमदनगर जिल्ह्यातही चांगले काम चालले आहे. त्यामुळे शरद पवार लवकर प्राजक्त तनपुरे यांच्या जोडीला आमदार लंकेंनाही मंत्रीपद देतील. अॅड. राहुल झावरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी. ते निवडूऩ आल्यावर त्यांना सभापती बनविण्याची मागणी मी स्वतः करेल, असा शब्द मेहबूब शेख यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in