...हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख - जयंत पाटील

तीन कोटी 80लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
...हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख - जयंत पाटील
nilesh lanke.jpg

पारनेर : राज्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील काल उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून त्यांना पारनेर तालुक्यातील सुपे या येथे एका कार्यक्रमात जायचे होते.

पारनेर तालुक्यातील सुपे-वाळवणे रस्त्यावरील एक कोटी 60 लाख रूपये खर्चाच्या पुलाचे, दोन कोटी रूपये खर्चाच्या वळवणे ते अस्तगाव रस्ता कामाचे व वाळवणे गावठाण ते शिवरस्ता अशा सुमारे तीन कोटी 80 लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते. 

हेही वाचा...

कार्यक्रम सायंकाळी सात वाजता असताना पाटील तब्बल पाच तासाहून अधिक उशीराने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आले. इतक्या उशीरापर्यंतही कार्यकर्ते थांबून असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करत हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत म्हसवड येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेस पहाटे चार वाजता ही लोक उपस्थित होते याची आठवण करून दिली.

जयंत पाटील म्हणाले, राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट असले तरीही महाविकास अघाडीचे सरकार जनहिताची कामे सरकार मागे पडू देणार नाही. आज एवढा उशीर झाला असला तरीही कार्यकर्ते व आमच्या पक्षावर प्रेम करणारी मायबाप जनता पाऊसातही थांबून आहे हीच खरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आह.

आमदार लंके यांच्या मागणीनुसार  तालुक्यातील ज्या गावात पाणी गेले नाही त्या गावात आम्ही पाणी पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. राळेगण थेरपाळ, जातेगाव सह इतर गावाच्या पाणी योजणा लवकरच मार्गी लावण्यात येतील.

हेही वाचा...

लंके हे जनहिताची कामे मोठ्या प्रमाणात करत आहेत. विधानसभेतही त्यांचे काम उत्तम आहे. सचिन पठारे व त्यांच्या पत्नी या दोघांवर गावाने उपसरपंच व सरपंच पदाची जबाबदारी सोपविली हे देशातील पहिलेच गाव असेल की पती पत्नीवर  गावाची संपुर्ण जबाबदारी सोपविली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष बाबजी तरटे, अशोक सावंत, सुदाम पवार, अॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, भाऊसाहेब भोगाडे, सरपंच जयश्री पठारे, उपसरपंच सचिन पठारे, संजीव भोर, सचिन काळे, पूनम मुंगशे, राजश्री कोठावळे, डॉ बाळासाहेब कावरे, अक्षय थोरात आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in