...त्यामुळे मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच राहिलो!

थोरात कुटूंब व शरद पवार यांचे पहिल्यापासून स्नेहपूर्ण संबंध आहेत. या बाबत बाळासाहेब थोरात यांनी एका मुलाखतीत जाहीर कबुली देत एक मोठा गौप्यस्फोट केला.
...त्यामुळे मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच राहिलो!
balasaheb thorat.jpg

अहमदनगर : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. या महाविकास आघाडी तयार होण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेत मोठी खेळी खेळली होती. थोरात कुटूंब व शरद पवार यांचे पहिल्यापासून स्नेहपूर्ण संबंध आहेत. या बाबत बाळासाहेब थोरात यांनी एका मुलाखतीत जाहीर कबुली देत एक मोठा गौप्यस्फोट केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देणाऱ्या दोन घटना आहेत. एक 1985 सालची तर दुसरी 1999ची आहे. माझे वडील भाऊसाहेब थोरात हे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन होते. मला तरुणपणापासूनच राजकारणात यायची इच्छा होती. मी डाव्या विचारसरणीला झुकलेला असल्याने महाविद्यालयीन जीवनात अनेक चळवळीशी संलग्न होतो. वकील झाल्यावर मी विडी कामगार, पाणी प्रश्न, निळवंडे धरण आदी चळवळींचा हिस्सा झालो. त्यामुळे वकिली मागे पडली राजकारण सुरू झाले.

हेही वाचा...

1985 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे नुकतीच काँग्रेसची सूत्रे आली होती. संगमनेर विधानसभा मतदार संघाचे तिकीट माजी मंत्री बी. जी. खताळ पाटील
अथवा माझे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता होती. पण नेमके पुण्यातील शकुंतला थोरात यांना तिकीट देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील जनतेच्या अस्मितेला धक्का बसला. जनतेने मला कोंडले. उमेदवारी अर्ज माघारी घेऊ दिला नाही. मला उमेद्वार म्हणून जाहीर केले. मी पहिल्यांदा आमदार झालो. तो माझा राजकीय जन्म झाला. 

1999मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने नंतर सर्वांना वाटले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ, पण भाऊसाहेब थोरात थोडे तात्त्विक विचारांचे होते. ते म्हणाले नाही! तुला काँग्रेस पक्ष सोडता येणार ऩाही. त्यावेळी मी म्हटलं, पवार यांचेच वातावरण महाराष्ट्रात दिसते आहे. पुढे आमदारकीची निवडणूक आली आहे. ते म्हणाले तू काय आमदारकीसाठी राजकारण करतो काय? तत्त्वाचा विषय असतो. विचारांचा विषय असतो. त्याच्या बरोबर राहिले पाहिजे. शेवटी त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मी काँग्रेसमध्ये राहिलो. काँग्रेस पक्षानीही मला खूप संधी दिली.

हेही वाचा...

शरद पवार यांच्या बरोबर मी जेव्हा गप्पा मारत बसतो त्यावेळी ते भाऊसाहेब थोरातांच्या आठवणी काढतात. राजकारणात आम्ही वेगवेगळ्या दिशेने गेलो तरी वैयक्तिक जीवनातील आदर जिव्हाळा कमी झाला नाही, अशी कबुलीही बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in