रोहित पवारांकडे मनाचा मोठेपणा नाही...

प्रा.शिंदे म्हणाले ,"गेली अनेक वर्षे जामखेडच्या जनतेला स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही.
रोहित पवारांकडे मनाचा मोठेपणा नाही...
Ram shinde.jpg

जामखेड : जामखेडसाठी 139 कोटी रुपयांची उजनी पाणी योजना मंजूर झाली. त्यामुळे योजनेच्या श्रेयवादावरून जामखेडचे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठविली.

प्रा.शिंदे म्हणाले ,"गेली अनेक वर्षे जामखेडच्या जनतेला स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. 1974 साली पाणी योजना झाली होती. तेव्हाची लोकसंख्या आणि आताची वाढलेली लोकसंख्या यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे जामखेडकरांना नवीन पाणी योजना व्हायला हवी हे कुणाच्याही लक्षात आले नव्हते. 

हेही वाचा...

शहराला उजनीतून पाणी पुरवठा होऊ शकतो हे कोणाच्या लक्षात  नव्हते. मात्र राज्य मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळाले आणि उजनीतून योजना करण्याचा प्रस्ताव हाती घेतला. दोन वर्षे पाठपुरावा करून योजनेला मंजुरी मिळविली. मात्र पुढे दोन वर्ष ही योजना रखडली. तुटपुंज्या दुरुस्त्या सुचवत ही योजना 138 कोटीची करण्यात आली आणि यापुढे या योजनेचा कालावधी 24 महिने राहणार आहे.

वार्ड वाईज त्यांनी बोर्ड लावले. इतर कोणी बोर्ड लावले नाहीत.तर स्वतःहून बोर्ड लावले आहेत. ही योजना जर त्याच वेळी सुरू झाली असती तर आता उद्घाटन करता आले असते. मात्र फक्त आणि फक्त हे मी केले हे दाखवायचे, यासाठी एवढ्या मोठ्या योजनेच्या प्रतीक्षेत नागरिकांना ठेवण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. असं झुलवत, खेळवत ठेवायचं हा प्रयोग केल्यामूळे लोकांना त्यापासून मोठा त्रास होतोय. 

शेवटी लोकांना हे माहित आहे; ही योजना कधी झाली? कोणाच्या काळात झाली? कोण नगरसेवक होते? एक टक्का रक्कम कोणी भरली? कोणी प्रस्ताव आणला? कोणी सर्वे करण्याच्या सूचना दिल्या, या योजनेत काहीही बदल केलेले नाहीत. म्हणून फक्त श्रेय घ्यायचं म्हणून ही योजना रखडली.  प्रत्येक कामाचे उद्घाटन करायला लोकप्रतिनिधी जातात ते माझ्या काळात मंजूर झालेला कामांचे उद्घाटन करतात. 

माझा उदघाटन करायला विरोध नाही मात्र त्यांनी मोठ्या मनाने माझ्या काळात मंजूर झालेले नाही मात्र मी नारळ फोडतोय असे म्हणायला हवे; मात्र तसा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही. दोन वर्षात एकही सिमेंट बंधाऱ्याचे काम झाले नाही. 

माझ्या काळात जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाली म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. या रस्त्याचे कामे झालीत मात्र दोन वर्षात खड्डे बुजवण्याचे काम आहे ते करू शकले नाहीत. 

हेही वाचा...

केवळ पोस्टरबाजी करायची फेसबुकला नवीन नवीन पोस्ट फोडायचा एवढेच काम लोकप्रतिनिधी माध्यमातून सुरू आहे. ऐतिहासिक खर्डा किल्ला समोर भगवा झेंडा लावायचा हे विद्यमान आमदारांनी ठरवले आहे, काही हरकत नाही. भगव्या झेंड्याचा सर्वांना अभिमान आहे. तो असलाच पाहिजे. पण आम्ही साडेसात कोटी रुपये योजनेचा प्रस्ताव त्यावेळी किल्ल्यासाठी दाखल केला होता. 

पुरातत्व विभागाकडून 3 कोटी 86 लाख मंजूर करून घेतले. तात्कालिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन केले .त्यामधून भिंतीची दुरुस्ती, तटबंदी समोरच्या कमानीचे काम, भिंतीवर काँक्रिटीकरण ही कामे झाली आहेत. आमचे एक चुकलं; आम्ही कामं केली पण झेंडा लावला नाही. तो झेंडा लावायचं काम ते करताहेत. स्वागतार्ह आहे. मात्र झेंडा लावताना अर्धवट राहिलेला प्रस्ताव मंजूर करावा अशी आमची त्यांना विनंती आहे.  

आमदारांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. आजोबांच्या म्हणण्याला कवडीमोल किंमत देत मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महाविकास आघाडीतील आमदाराने कोरोनाच्या नियमांना धाब्यावर ठेवून कोरोना महामारी अंतर्गत सर्व नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात कर्जतला गर्दी जमविली. त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने गुन्हा दाखल करावा;  अशी आपण मागणी करत आहोत. जामखेडकरांसाठी चोवीस महिण्यापूर्वी मंजूर झालेली पाणी योजना कुठलेही कारण नसताना प्रलंबित ठेवली. केवळ आणि केवळ श्रेय घेण्याच्या हेतूनेच मंजूर असलेली योजना रखडवली,"  असा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.

पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे तालुकाध्यक्ष अजय काशीद युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष कारले विधी व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रवीण सानप शहराध्यक्ष बिभीषण धनवडे माजी शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तो केविलवाणा प्रयत्न
भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत या संदर्भात बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले,"माझ्या सहकाऱ्यांना आमदार  लोकांना खिंडीत पकडून पक्षप्रवेश घडवून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न  करीत आहेत. ते आता झाकून राहिलेला नाही. वैयक्तिक स्वरूपाच्या विषयावर बोट ठेवून, कोणाच्या व्यवसाय असतील त्यांना वेठीला धरून, लोकप्रतिनिधी पक्ष प्रवेश घडवून आणीत आहेत; असा आरोपही त्यांनी केला."

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in