श्रीगोंद्यात शेलार- नागवडे यांचे राजकीय पॅच-अप?

विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म मोडत नागवडे यांनी भाजपत प्रवेश केला. शेलार हे आघाडीचे उमेदवार होते.नागवडे यांच्याविरोधामुळे त्यांचा पराभव झाल्याची मोठी चर्चा होती.
श्रीगोंद्यात शेलार- नागवडे यांचे राजकीय पॅच-अप?
WhatsApp Image 2021-08-19 at 5.15.56 PM.jpeg

श्रीगोंदे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी शहरात सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनला काँग्रेस नेते आमदार डाॅ. सुधीर तांबे यांच्यासोबत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. Shelar-Nagwade's political patch-up in Shrigonda?

विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म मोडत नागवडे यांनी भाजपत प्रवेश केला. शेलार हे आघाडीचे उमेदवार होते. नागवडे यांच्याविरोधामुळे त्यांचा पराभव झाल्याची मोठी चर्चा होती. शेलार यांनीही अनेकवेळा पराभवाचे खापर नागवडे यांच्यावर फोडले आहे. आज हे दोघे एकत्र आल्याने त्यांचे मिटले असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा...

शहरात शेलार यांची पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्याचे उदघाटन आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शिवले यांच्या हस्ते झाले. मात्र यावेळी डाॅ. तांबे व राजेंद्र नागवडे यांची उपस्थिती राहिली. त्यातच नागवडे यांची हजेरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शेलार यांनी नागवडे यांच्याविषयी थेट नाराजी व्यक्त करीत कारखाना निवडणुकीत त्यांच्याविरुध्द फिल्डींग लावण्यासाठी अनेक बैठकाही घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी अनपेक्षित भाजपत प्रवेश केला. शेलार यांना आघाडीची उमेदवारी होती व त्यांचा निसटता पराभव झाला. नागवडे जर सोबत असते अथवा शांत राहिले असते तरी त्यांना विजय मिळला असता अशी चर्चा शेलार समर्थक करीत होते.


शेलार समर्थक कारखाना निवडणूकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत.  शेलार यांनीही नागवडे यांचे विरोधक असणारे केशव मगर यांच्यासमवेत रणनीती ठरविण्यासाठी बैठकाही घेतल्या. दरम्यानच्या काळात पंचायत समिती निवडणुकीत मगर समर्थक जिजाबापू शिंदे हे आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत गेल्याने शेलार दुखावले गेले. त्यातच आज नागवडे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या उदघाटनाला हजेरी लावत फोटो सेशन केल्याने चर्चा रंगली. भविष्यात हे दोघे एकत्र दिसण्याची शक्यता वाढली आहे.

आमदार डाॅ. तांबे हे आपणाला भेटण्यासाठी आले होते. योगायोगाने संपर्क कार्यालयाचे उदघाटन होते तेथेच ते आले. त्यांच्यासमवेत नागवडे हेही आले होते. 
- घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in