नगर, कर्जत-जामखेड आयटी सेंटरसाठी रोहित पवारांचे प्रयत्न

मतदार संघाबरोबरच नगर, बारामतीतही आयटी सेंटर सुरू करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
rohit dada pawar.jpg
rohit dada pawar.jpg

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधी आणत आहेत. त्यातून नवनवीन योजना मतदार संघात राबविल्या जात आहेत. या विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी तसेच मतदार संघात पायभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच आठ केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली होती. Rohit Pawar's efforts for Nagar, Karjat-Jamkhed IT Center

आता मतदार संघाबरोबरच नगर, बारामतीतही आयटी सेंटर सुरू करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू ही केले आहे.

हेही वाचा...

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने 'कॅपगेमिनी' या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामती, कर्जत-जामखेड, नगर,सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये आयटी सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली.

यावेळी या शिष्टमंडळाने विद्या प्रतिष्ठान आणि 'ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट'ला भेट देऊन विविध प्रकल्पांचीही माहिती घेतली. यामध्ये कंपनीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अश्विनी यार्डी, कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष जगदीश कुचम आणि कुमार अनुराग प्रताप यांचा समावेश होता.

हेही वाचा...

विद्या प्रतिष्ठान, 'ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट' आणि 'कृषी विज्ञान केंद्रा'च्या माध्यमातून शिक्षण, कृषी-तंत्रज्ञान, डेअरी आदी क्षेत्रात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत सुरू असलेले विविध प्रकल्प आणि त्याचा राज्यावर होणारा परिणाम हे पाहून या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.

आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कर्जत-जामखेडमध्ये आयटी सेंटर झाल्यास परिसरातील उच्च शिक्षित युवकांना लाभ तर होईलच शिवाय रोजगाराच्या नवीन संधी युवकांना मिळणार आहे. 

बारामतीत झालेल्या या कार्यक्रमाची माहिती आमदार रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केली आहे. या पोस्टमुळे कर्जत-जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यातील युवकांत आनंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com