हे फक्त बारामतीतच घडू शकते...

राजकीय नेत्यांनी टाईम मॅनेजमेंट कसे करावे याचे उत्तम उदाहरण अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात घालून दिलेले आहे.
Ajit pawar.jpg
Ajit pawar.jpg

बारामती : वेळ सकाळी सहाची... ठिकाण बारामती तालुक्यातील पणदरे.... एका पेट्रोल पंपावर लोक जमले होते.... बरोबर वेळेवर गाड्यांचा ताफा येतो.... त्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार उतरतात आणि पेट्रोल पंपाचे उदघाटन होते. तेथून लगेच पुढील दौरा सुरु होतो... This can only happen in Baramati ...

केवळ स्थानिक नागरिकच नाही तर सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पहाटे उठण्याची बारामतीत आल्यावर सवयच लागून जाते. पहाटे पावणेसहावाजताच अजित पवार बाहेर पडत असल्याने अधिकारीही उरकून बाहेर पडतात हे चित्र बारामतीत दिसते. 

सकाळी सहा वाजता उदघाटनासाठी वेळ द्यायची, ती पाळायची आणि त्या उदघाटनाला लोकही आवर्जून येतात हे फक्त बारामतीतच घडू शकते. राजकीय नेत्यांनी टाईम मॅनेजमेंट कसे करावे याचे उत्तम उदाहरण अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात घालून दिलेले आहे. 

हेही वाचा...

हा कार्यक्रम सुरु झाल्यावर अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या निवेदनांवरही तातडीने निर्णय होत होते. माईकवरुनच एका कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी त्यांनी केली आणि स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना पुण्यातील दवाखान्यातील डॉक्टरांना दोन रुग्णांच्या बाबत सूचना देण्याचेही निर्देश दिले. दवाखान्याच्या कामाबाबत पवार कमालीचे संवेदनशील असतात याचा प्रत्यय आजही आला. 

वेळा दिल्या तर त्या पाळायच्या, कार्यक्रम लांबत असेल तर उठून कार्यक्रमात स्वताः माईकचा ताबा घेत उरकत घ्यायच आणि पुढील कार्यक्रमाला भराभर निघून जायच, यात अजित पवार यांचा हातखंडा आहे. आजही बारामतीत सकाळी सहा वाजता अजित पवार यांचा पेट्रोलपंपाच्या उदघाटनाचा कार्यक्रम होता. तो वेळेवर झाला आणि त्याला लोकही आवर्जून आले. 

हेही वाचा...

पहाटे पावणेसहालाच आज अजित पवार बाहेर पडले होते. इतर ठिकाणी सकाळी सहाला कार्यक्रम घ्यायला ना कार्यकर्ते तयार होणार, ना नेते आणि त्या कार्यक्रमाला उपस्थितही कोण राहणार नाही, अशीच स्थिती आहे. नेते स्थानिक वातावरणाला दिशा देतात, अजित पवार यांनी बारामतीकरांना पहाटे लवकर उठून आवरुन कामाला लागायचे ही सवय लावली आहे आणि त्या मुळेच बारामतीत अगदी पहाटे सुध्दा उदघाटनाचे कार्यक्रम होतात. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com